Viral News : तरुणीचा मोठा जुगाड, घर घेण्यासाठी लोन न काढता 20 बॉयफ्रेंडकडून मागितली 'ही' एक गोष्ट

Viral News : आपल्या स्वप्नाच घर विकत घ्यायच असेल तर आपण लोन काढतो. पण एका तरुणीने लोन न घेता 20 बॉयफ्रेंडकडून एकच वस्तू मागितली आणि त्यानंतर तिने...

नेहा चौधरी | Updated: Jul 8, 2024, 06:13 PM IST
Viral News : तरुणीचा मोठा जुगाड, घर घेण्यासाठी लोन न काढता 20 बॉयफ्रेंडकडून मागितली 'ही' एक गोष्ट title=
Viral News Girl without taking a loan to buy a house 20 boyfriends 20 iphones

सोशल मीडियाच्या जगात अनेक व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल होत असतात. त्यातील काही पोस्ट आपले लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीच्या जुगाडी तुफान चर्चा सुरु आहे. सोशल मीडियाच्या या पोस्टमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलंय. ज्यामध्ये चीनमधील एका मुलीने घर विकत घेण्यासाठी लोन काढलं नाही. तर तिने 20 बॉयफ्रेंड बनवले त्यानंतर तिने जो जुगाड केला ते ऐकून तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

एका घरासाठी तिने बनवले 20 बॉयफ्रेंड अन् मग!

हो तुम्ही बरोबर वाचत आहात. या तरुणीने घर विकत घेण्यासाठी तिने 20 बॉयफ्रेंड आणि त्या प्रत्येकाकडून तिने एक गोष्ट गिफ्ट म्हणून मागितली. विशेष म्हणजे त्या 20 बॉयफ्रेंड तिला ती भेटवस्तू दिली पण...त्या तरुणीने 20 बॉयफ्रेंडला आयफोन गिफ्ट म्हणून मागितला. हे प्रकरण इथे थांबत नाही पुढे तिने घर विकत घेण्यासाठी काय केलं ते तर जाणून घ्या. 

या गिफ्ट मिळालेल्या 20 आयफोन घेऊन ती बाजारात गेली आणि तिने ते विकले आणि त्यातून आलेल्या पैशातून तिने स्वतःसाठी घर घेतलं. ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफार्मवरील @tech_grammm या इन्स्टाग्राम अकाऊंटने शेअर करण्यात आली आणि त्यानंतर ती क्षणात व्हायरल झाली आहे. 

ही पोस्ट 1 कोटी 71 लाखांहून अधिक वेळा पाहिल्या गेली आहे. तर 1 लाख 60 हजारांहून अधिक लोकांनी ती शेअर केलीय. एवढंच नाही तर शेकडो लोकांनी कमेंटही केल्या आहेत. कमेंट करताना पलक नावाच्या युजरने लिहिलंय की, तिने बरोबर केलंय, 'तिला फक्त एकच फोन हवा आहे, मग बाकीच्या 19 फोनचे ती काय करणार?' तर Adviti नावाच्या युजरने लिहिलंय की, 'मला चीनमधील स्वस्त घरं खूप आवडतात. तरी मी तिच्या या विचित्र कृतीचे समर्थन करत नाही.' तर शेख अब्दुल नावाच्या व्यक्तीने लिहिलंय की, 'आता आपल्या देशातील मुलींनाही या चिनी मुलींकडून अशी कलाबाजी शिकावी लागेल वाटतं.'

पण ही व्हायरल पोस्ट खरी आहे का? हे तपासण्यासाठी, आम्ही Google वर शोध घेतला आणि असं दिसून आलं की ही व्हायरल पोस्ट नुकतीच Instagram वर शेअर करण्यात आली असली तरी, घटना 2016 ची आहे. प्राउड किआओबा या चिनी ब्लॉगरने ही घटना उघडकीस आणली होती. फसवणूक करणाऱ्याचे नाव झियाओली असून तो किआओबासोबत काम करत होता. मुलीने स्वत: या ब्लॉगरला सांगितलं की मुलीने तिच्या 20 मित्रांना 20 नवीन आयफोन 7 खरेदी करण्यासाठी राजी केलं. त्यानंतर त्याने हे आयफोन विकले आणि त्या पैशातून तिने घर खरेदी करण्यासाठी डाउन पेमेंट केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tech Grammm (@tech_grammm)

त्यादरम्यान, किओबाने सांगितले होते की जेव्हा Xiaoli ने सांगितले की तिने 20 iPhones एका मोबाईल फोन रिसायकलिंग प्लांटला 14 लाख 87 हजार 93 रुपयांमध्ये विकले आणि नंतर ते घर विकत घेण्यासाठी वापरलेय. शिओली श्रीमंत कुटुंबातील नव्हती, त्यामुळे घरासाठी पैसे उभे करण्यासाठी तिने हा जुगाड केला होता.