Viral News : जुळ्या बहिणींचा एकुलता एक नवरा! एकत्र करतात संसार, आता मुलासाठी ठेवली अशी अट

Viral News : एकाच माणसाच्या प्रेमात पडलेल्या दोन जुळ्या बहिणी, लग्न केलं..एकत्र संसार करता आता मुलासाठी दोघींनीही ठेवली विचित्र अट...सोशल मीडियावर सध्या या विचित्र प्रेम कहाणीची चर्चा होतेय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 8, 2024, 05:03 PM IST
Viral News : जुळ्या बहिणींचा एकुलता एक नवरा! एकत्र करतात संसार, आता मुलासाठी ठेवली अशी अट  title=

Trending News : प्रियकर प्रेयसी असो किंवा पती पत्नी...या दोघांमध्ये तिसऱ्याला जागा नसते. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. असं म्हणतात जुळ्यांचं दुखणं सारखंच असतं. तसंच काहीस या दोन बहिणींचं आहे. लहानपणापासून दोघींनाही सगळ्या गोष्टी एक सारख्या हव्या असतात. मोठ्या झाल्यावर या दोघींना एकाच व्यक्तीवर प्रेम जडलं. विशेष म्हणजे एकुलता एक नवऱ्यासोबत या जुळ्या बहिणी संसार करतायेत. आता या दोघांनी मुलांबाबत विचित्र अट ठेवली आहे. सोशल मीडियावर या विचित्र मागणीची चर्चा रंगली आहे. 

मुलासाठी जुळ्या बहिणींची विचित्र अट!

त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या दोघी ऑस्ट्रेलियाच्या असून ॲना डिसिंके आणि लुसी डिसिंके अशी या जुळ्या बहिणींची नावं आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये दोन्ही बहिणी डॉक्टरांकडे गेलेल्या दिसत आहे. मुलाबाबत त्या डॉक्टरकडे गेल्या आहेत. तिथे डॉक्टरने त्यांच्या पाटर्नरबद्दल विचारलं असता. त्यांनी आम्ही दोघी एकाच व्यक्तीवर प्रेम करतो आणि आम्ही त्याचासोबत एकत्र संसार करत आहे. हे ऐकून डॉक्टरही आश्चर्यचकित होतात. त्या व्यक्तीच नाव बेन आहे असं सांगितलं. 

आता या दोघींना एकत्र प्रेग्नेंट व्हायचं आहे. हे शक्य आहे हे विचारण्यासाठी या डॉक्टरकडे गेल्या होत्या. तेव्हा डॉक्टरांनी त्याला खात्री दिली की हे नक्कीच शक्य आहे. यानंतर डॉक्टर म्हणाले की जेव्हा मी त्यांची कहाणी ऐकली तेव्हा मला नवलंच वाटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BDC (@bdc_world)

या जुळ्या बहिणी बऱ्याच दिवसांपासून एकत्र गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करत करत असल्याच त्यांनी सांगितंल. त्यासाठी त्या दोघी वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटत होत्या. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण आम्ही तुम्हाला सांगतो की या जुळ्या बहिणी सारखेच कपडे घालण्यापासून बाथरूमला एकत्र जाण्यापर्यंत सर्व काही गोष्टी एकत्र करतात. अशा परिस्थितीत आता त्यांना एकत्र गरोदर राहायचं आहे. ॲना आणि लुसी या दोघी ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये राहतात. त्या 38 वर्षांच्या असून 2021 पासून ते एकत्र गरोदर राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मात्र त्यांच्या प्रयत्नाला अद्याप यश आलेले नाहीत. ॲना आणि ल्युसी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून आणि त्यांचे व्हिडीओ ट्रेंडिग होत असतात. पण डॉक्टरांच्या भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. हा व्हिडीओ @bdc_world ने शेअर केला असून आत्तापर्यंत या व्हिडीओला 80 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखो लोकांनी तो लाईक आणि शेअर केलाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

व्हिडीओवर तुफान कमेंट्सही येत असून बर्नार्ड नावाच्या वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिलंय की 'मला वाटते की दोघांचेही मन समान आहे.' तर क्रिस कॉनरने लिहिलंय की, 'जर तिला त्याच वेळी गर्भवती व्हायचे असेल तर ती आयव्हीएफचा अवलंब का करत नाही?' आणखी एका युजरने लिहिलंय की, 'मला वाटते की बेनला त्याच्या तळघरात ओलीस ठेवण्यात आलंय. दरम्यान डॉक्टर आणि तज्ज्ञ सांगतात की, बहुतेक एकसारख्या जुळ्या मुलांमध्ये परस्पर साम्य असतं. त्यांच्या आवडी-निवडी सारख्याच असतात.