फ्लोरिडा : लोकांसमोर वाईट परिस्थिती आली की, लोकं खचतात, त्यांना काय करावे हे सुचत नाही? काही लोकं तर आपलं आयुष्य देखील संपवतात. परंतु अमेरिकेच्या फ्लोरिडामधील या महिलेनं लोकांसाठी एक नव उदाहरण समोर ठेवलं आहे. कारण हिने तिच्या आयुष्यातील एका नकोश्या गोष्टींला स्वीकारुन त्याला एक शस्त्र म्हणून वापरलं ज्यामुळे ती आता लाखों रुपये कमवत आहे.
महिलांसाठी जगासमोर सुंदर दिसणे हे खूप महत्वाचे असते, त्यासाठी ते लाखो रुपये खर्च करतात आणि खूप मेहनत घेतात. महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी जे शक्य आहे ते करतात.
त्यात महिलांना आपल्या शरीरावरील केसांची लाज देखील वाटते, त्यामुळे ते लोकांपासून लपवतात. परंतु अमेरिकेतील फ्लोरिडामधील जीनच्या बाबतीत काही वेगळंच घडलं आहे.
जीनच्या तोंडावर पुरुषांसारखी दाट दाढी येते. पण तिला याचे वाईट वाटत नाही किंवा तिला याची लाज देखील वाटत नाही. उलट ती याला स्वीकारते आणि तिला आपला असा चेहरा आवडतो देखील. पण असं का?
द सन मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जीन रॉबिन्सन 35 वर्षांची आहे, ती अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आर्थिक विश्लेषक म्हणून काम करते. जेव्हा ती 20 वर्षांची होती, तेव्हा तिला प्रथम कळले की, तिच्या शरीरात हार्मोनस असंतुलन आहे. यामुळे जीनच्या तोंडावर दाट काळे केस येऊ लागले
जीनने सांगितले की, केस फक्त तिच्या चेहऱ्यावरच येत नाही, तर तिच्या छातीवर आणि शरीराच्या इतर भागांवर देखील येतात. यामुळे ती सुरवातीला खूप अस्वस्थ झाली. होती. खरेतर जीनला Polycystic Ovary Syndrome आहे, ज्यामुळे तिच्या शरीरावर पुरुषांप्रमाणे केस येतात.
जीनने सांगितले की, शरीरावर येणाऱ्या केसांच्या असामान्य वाढीची ती आता चिंता करत नाही किंवा तिला त्याची आता लाज देखील वाटत नाही. या उलट ती आता स्वतःच्याच प्रेमात पडली आहे. ती आता सोशल मीडियाद्वारे शरीरावरील केस काढण्यासाठी नवीन आणि सोप्या पद्धती लोकांसोबत शेअर करते आणि पैसे कमावते.
जीनने सांगितले की, यापूर्वी ती आपले केस लपविण्यासाठी खूप प्रयत्न करायची. ती पुरुषांप्रमाणे दररोज दाढी करायची. यामुळे तिला स्वत:ची खूप लाज वाटायची ज्यामुळे तिला मित्रांसह पार्टी करणे किंवा बीचवर जाणे देखील पसंत नव्हते.
यामुळे जीनने अद्याप कोणताही प्रियकर देखील बनवला नाही. परंतु आता तिला याचे काहीही दु:ख नाही. कारण तिने आता आनंदी राहाण्याचा पर्याय शोधून काढला आहे.