Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का?

Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रत्येकालाच भावूक करत आहे. तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी टक्कल केलं. कोण ती आणि काय केलं असं त्यांनी...हा व्हिडीओ हृदयाला जाऊन भिडतोय...

नेहा चौधरी | Updated: May 17, 2023, 03:13 PM IST
Viral : तिच्यासाठी सलूनमध्ये सगळ्यांनी केलं टक्कल, हा हृदयस्पर्शी Video पाहिला का? title=
Viral video barber and friends shave head support cancer patient woman trending video on social media

Cancer Patients Video Viral : कर्करोग म्हणजे कॅन्सर हा शब्द ऐकला की अंगावर काटा येतो. हा जीवघेणा आजार गेल्या काही वर्षांमध्ये आपले हातपाय पसरवतं आहे. हा आजार माणसा आतून खिळखिळा करुन सोडतो. मृत्यूची भीती, केमोथेरपीच्या असह्या वेदना, केस गळणं, कुरुपपणा यामुळे रुग्ण आपला आत्मविश्वास गमवून बसतो. हा आघात एवढा भयानक असतो की, या सगळ्या वेदनेवर मृत्यूच्या पलीचे ते मृत्यूला कवटाळतात. या रुग्णांना या क्षणात पदोपदी मानसिक आधाराची गरज असते. सलूनमध्ये एका महिलेचा टक्कल करतानाचा एक व्हिडीओ प्रत्येकाला भावूक करतोय. 

अन् तिच्यासाठी प्रत्येकाने टक्कल केलं...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका महिलेचे केस काढून तिला टक्कल करण्यात येतं आहे. तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर आला आहे. ती खचून गेली आहे. ती एक कॅन्सर पेन्शट आहे. तिचे केस कापताना तिच्या डोळ्यातून पाणी येतंय. हे पाहून सलूनवाल्याने आपल्या केसांवर मशीन फिरवली...ती त्याला थांब थांब म्हणत होती पण तिच्या हे कृत्य तिला आधार देणारं ठरलं. (Viral video barber and friends shave head support cancer patient woman trending video on social media)

त्या सलूनवाल्याचं कृत्य पाहून महिलेला अजून रडू आलं. तर सलूनमध्ये तिच्या मुलगाही तिच्यासोबत होता. त्याने सलूनवाल्याचं कृत्य पाहून त्यानेही ती मशिन त्याचा केसावरुन फिरवायला सांगितली. त्याच पाहून सलूनमधील तिसऱ्या तरुणानेही त्या महिला आधार देण्यासाठी आपल्या केसावरुन मशीन फिरवली. 

असं तुमचं एक कृत्य त्यांच्यासाठी...

आपल्या मुलाचं आणि सलूनमधील तरुणांचा प्रेम पाहून ती महिला अजून भावूक झाली. हा व्हिडीओ प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडतोय. खरंच या कॅन्सर रुग्णांसाठी तुमचं एक कृत्य संजीवनी ठरतं. हा व्हिडीओ Guilherme Magalhaes नावाच्या इंस्टाग्राम आयडीवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक होऊन त्या तरुणांचं कौतुक करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महिला असो पुरुष कॅन्सरची लढाई ही प्रत्येक रुग्णांसाठी अतिशय कठीण असते. त्यांना अशावेळी मानसिक आणि भावनिक आधाराची खूप गरजचं असते. तुमचं एक कृत्य त्यांचा आयुष्यात सकारात्मक उर्जा आणू शकतं. 

हेसुद्धा वाचा - World Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video