मुंबई : रस्त्यावरून जाताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे लोकांना अनेकदा सांगितले जाते, कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही. रस्ता ओलांडताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. रस्ता ओलांडण्यापूर्वी डावीकडे आणि उजवीकडे पाहून रस्ता क्रॉस करावा. दररोज अनेकांना रस्ते अपघातांना सामोरे जावे लागते, मग ती त्यांची चूक असो वा नसो. रस्ते अपघातातून फार कमी लोक सुखरूप बाहेर पडतात. असे म्हणतात की नशीब चांगले असेल तर मृत्यूलाही हरवता येते. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ऑटोरिक्षा आणि कार यांच्यात मोठा अपघात झालेला दिसतोय. एक महिला यात सुखरुप बचावली आहे. व्हिडीओमध्ये एक महिला रस्ता ओलांडत होती. भरधाव वेगात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने पार्क केलेल्या ऑटोला धडक दिल्याने ऑटो पलटी होऊन कार पुढे गेली. यावेळी महिला यातून बतावली. अपघाताच्या वेळी महिलेच्या डाव्या बाजूने कार बाहेर आली, तर ऑटो उजव्या बाजूने उलटला. या अपघातात महिला बचावली.
Narrow escape but how long do we depend on luck?
Be responsible on Roads #RoadSafety pic.twitter.com/JEck2aXIuK
— V.C. Sajjanar, IPS (@SajjanarVC) September 1, 2022
लोकांना रस्ता सुरक्षा नियमांचे नियमित आणि काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जाते. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'सर लोकांनी नियमांचे पालन करणे बंद केले आहे, विशेषतः रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणे.' आणखी एका युजरने लिहिले की, 'अनेक लोक इतरांची पर्वा करत नाहीत आणि बेजबाबदारपणे वेगाने गाडी चालवतात.