बाकावर बसून व्यायाम करत होता व्यक्ती, अचानक घडलं असं काही की... पाहा व्हिडीओ

जर तुम्ही वेळ काळ न पाहाता कुठेही सुरू झालात तर ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते.

Updated: Nov 28, 2021, 08:09 PM IST
बाकावर बसून व्यायाम करत होता व्यक्ती, अचानक घडलं असं काही की... पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर अनेकदा अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. अलीकडच्या असाच एक व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जे पाहिल्यानंतर या व्यक्तीसोबत जे काही घडलं ते पाहून हसू थांबणार नाही. आपल्या हे माहित आहे की, आपल्या शरीरासाठी पुरेशी झोप आणि अन्न हे महत्वाचे घटक आहेत. परंतु त्याच बरोबर दररोज शरीराच्या फायद्यासाठी व्यायाम देखील तितकाच महत्वाचा आहे. नियमित व्यायामामुळे आपण केवळ शारीरिकच नव्हे तर आपण मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतो, परंतु हे लक्षात घ्या की व्यायाम करण्याची एक वेळ असते व्यायामालाही स्वतःचा वेळ असतो. 

जर तुम्ही वेळ काळ न पाहाता कुठेही सुरू झालात तर ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते, कारण कोणत्या वेळी कोणतंही काम करण्यासाठी आपलं शरीर तयार नसतं. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा व्यायामाशी संबंधीत व्हिडीओ आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बेंचवर बसून व्यायाम करत असते, पण नंतर त्याच्यासोबत असे काही घडते की, जे पाहून तुम्ही पोट धरुन हसाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, हा व्यक्ती बेंचवर बसतो आणि व्यायाम करू लागतो. त्यानंतर तो तेथील एका ब्लॉकवरती झोपतो आणि मग मान उचलण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला तसे उठताच येत नाही, ज्यामुळे त्याचा तोल बिघडतो आणि तो व्यक्ती मागे उलटा पडतो.

परंतु खरी गंमत तर पुढे आहे. हा व्यक्ती पडल्यानंतर देखीसल तसाच उभा राहतो आणि व्यायाम करण्यासाठी सुरू करतो आणि असे दाखवण्याचा लगेच तिथे उभा राहून कसरत करू लागतो, जणू असे काही त्याच्यासोबत घडलेच नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर युजर्सकडून खूप पसंत केला जात आहे. याच कारणामुळे या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'ज्या पद्धतीने तो माणूस पडला तो खूप मजेदार होता.' याशिवाय इतर अनेक यूजर्सनी व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.