Money Raining on Highway : बर्फवृष्टी, गारांचा पाऊस असं पावसाचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ व्हायरल (Funny video viral on social media) होतो आहे तो पाहून तुम्ही अवाक् व्हाल. घरात जर कोणी एखादी महागडी वस्तू घेण्याचा विषय काढला तर आपसुक आपल्या तोंडातून एक वाक्य निघतं आपल्याकडे काय पैशाचा पाऊस (Cash Rain) पडतोय का? ऐकलं आहात ना तुम्ही पण असं वाक्य...पण सोशल मीडिया एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात पैशाचा पाऊस होतोय. हो अगदी बरोबर खऱ्याखुऱ्या पैशाचा पाऊस आणि तोही महामार्गावर...
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महामार्गावर अनेक गाड्या धावत (Cash rain on Freeway) आहेत... आणि अचानक एका कारमधून पैशांची बॅग खाली फेकली जाते. महामार्गावर सगळेकडे नोटांचा खच पसरलेला दिसतो. यातील मजेदार गोष्ट म्हणजे काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता तिथे पोलिसांची गाडी येते. महामार्गावर पैशांचा खच पाहून पोलीस (Policemen) गाडीतून उतरुन पळत-पळत ते उचलायला जातात. (Viral Video Money Raining on Highway nmp)
A shop burglary ended in a car chase and money being showered onto a highway in Chile.
According to local media, the alleged burglars tried to steal nearly 10m Chilean pesos ($10,300). pic.twitter.com/1v7HJxnIUH
— PressTV Extra (@PresstvExtra) October 22, 2022
तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकी ही घटना आहे तरी काय? तर दरोडेखोऱ्यांनी पैसे लुटल्यानंतर ते महामार्गावरुन पळ काढतं होते. पोलीस त्यांचा पाठलाख करत होते. अशात पोलिसांपासून वाचण्यासाठी चोर कारमधून पैशांनी भरलेली बॅग फेकून देतात. त्यामुळे पोलिसांना हे चोरीचे पैसे गोळी करण्याची वेळ येते. ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आणि नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही घटना चिलीमधील महामार्गावर (highway in Chile) घडली आहे. दरम्यान पोलिसांनी त्या 6 दरोडेखोरांना अटक केली आहे.