Live VIDEO: भरधाव वेगात कार चालवताना मोबाईल पाहणं पडलं महागात; YouTuber च्या कोटींच्या कारचा चेंदामेंदा, मित्र रक्तबंबाळ

अमेरिकेतील युट्यूबर (US YouTuber) लाईव्हस्ट्रीम करत असतानाच आलिशान स्पोर्ट्स कारचा अपघात झाला. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 8, 2024, 12:08 PM IST
Live VIDEO: भरधाव वेगात कार चालवताना मोबाईल पाहणं पडलं महागात; YouTuber च्या कोटींच्या कारचा चेंदामेंदा, मित्र रक्तबंबाळ title=

सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात एकीकडे काहीजण प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही स्तर गाठताना दिसतात, तर दुसरीकडे दिवसरात्र मोबाईल हातात घेत त्यावरील व्हिडीओ, रिल्स पाहणारे असतात. सोशल मीडियावर रोज एखादा नवा व्हिडीओ व्हायरल होत असतो आणि मग त्याची चर्चा सुरु होते. युट्यूबला लाईव्ह स्ट्रीम करण्याचं असंच एक व्यसन आहे ज्याने अनेक तरुणांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. हे व्यसन किती धोकादायक असतं याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. अमेरिकेतील 20 वर्षीय युट्यूबरचा लाईव्ह स्ट्रीमच्या नादात भीषण अपघात झाला आहे. या अपघतात त्याच्या 1 कोटी 70 लाखांच्या आलिशान स्पोर्ट्स कारचा अक्षरश: चेदामेंदा झाला. फ्लोरिडामधील मियामी येथे हा अपघात झाला. 

हा संपूर्ण अपघात लाईव्हस्ट्रीम व्हिडीओत कैद झाला आहे. आपल्या धाडसी स्टंटसाठी ओळखला जाणारा डोहर्टी 5 ऑक्टोबर रस्त्यावरुन वेगाने कार पळवत होता. यावेळी रस्ता ओला असल्याचं दिसत आहे. दरम्यान वेगाने कार पळवत असताना डोहार्टीचं लक्ष मोबाईलमध्येही होतं. तो मधेमधमे मोबाईल तपासत होता. अशाच एका क्षणी मोबाईलमुळे त्याचं कारवरील नियंत्रण सुटतं आणि अपघात होतो. 

व्हिडीओत कार नियंत्रण सुटून रस्त्याबाहेर जाते आणि साईडिंगवर आदळते. कारचं नियंत्रण सुटल्यानंतर डोहार्टी ओरडत असल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे. लाईव्हस्ट्रीम होत असल्याने युजर्सना अपघाताआधीचा आणि नंतरचा प्रत्येक क्षण पाहता आला आहे. 

डोहार्टीने अपघातानंतचंही फुटेज शेअर केलं आहे. यामध्ये तो मदतीसाठी ओरडताना दिसत आहे. अपघातानंतर तो कारमध्येच अडकला होता. यावेळी तेथून जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवासी मदतीसाठी धावले. यावेळी एकाने त्यांचा कॅमेरा पकडला होता. डोहार्टीला खिडकीतून ओढून बाहेर काढण्यात आलं. 

अपघातानंतर तिथे नेमकी काय स्थिती होती हेदेखील व्हिडीओत दिसत आहेत. डोहार्टीच्या 1.7 कोटींच्या कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. संपूर्ण रस्त्यावर कारचे तुकडे पडले होते. तर त्याचा मित्र रक्तबंबाळ झाल्याचं दिसत आहे. 

नेटकऱ्यांकडून टीका

सोशल मीडियावर अनेकांनी डोहार्टीवर टीका केली आहे. युजर्सनी त्याच्या बेजबाबदारपणावरुन संताप व्यक्त केला आहे. त्याचे इतके कोटी चाहते असताना अशाप्रकारे बेजबाबदार वागणं योग्य नाही असं अनेकांनी सांगितलं आहे. 

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिथे डोहर्टीने क्रॅश प्रसारित केला होता त्या किकने त्याच्या खात्यावर बंदी घालत कारवाई केली. "आम्ही बेकायदेशीर गोष्टींना माफ करत नाही, आणि या घटनेने सुरक्षा आणि जबाबदारीची प्रत्येक सीमा ओलांडली," असं किकच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. जॅक डोहर्टीने गेल्या वर्षाच्या शेवटी मॅक्लारेनला 1.7 कोटी रुपयांना विकत घेतलं होते, आपल्या YouTube चॅनेलवर अभिमानाने त्याने हा कार दाखवली होती.