नोकरीचा राजीनामा दिल्यावर तरुणाचा आनंद गगनात मावेना, चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं; पाहा Video

Fabrizio Villari Moroni : फ्रेंच सोशल मीडिया इन्फ्लुयसर फॅब्रिझियो विलारी मोरोनी याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 2, 2024, 11:31 PM IST
नोकरीचा राजीनामा दिल्यावर तरुणाचा आनंद गगनात मावेना, चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं; पाहा Video title=
Viral Video of French Influencer Dancing In Rain Quitting 9 to 5 Job

French Influencer Viral Video : विंदा करंदीकर यांची 'तेच ते नि तेच ते' या कवितेचा प्रत्यय अनेकांना आत्तापर्यंत आयुष्यात आला असावा. डिग्री घेऊन कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडल्यावर ज्या आयुष्याला सामोरं जावं लागतं, याचा विचार न केलेला बरा... प्रत्येकाला 9 ते 5 लाईफचा कंटाळा आलाय. मिंत्रासोबत गप्पा मारताना एकदा तरी तुमच्या मित्राने याविषयीची तक्रार केली असेल. गोठ्यात बांधलेल्या बैलासारखं काम करणाऱ्या गर्दीतले तुम्ही सुद्धा असालच. मात्र, काहीजण वेगळा मार्ग निवडतात. एकाद्या कचाट्यातून सुटकी झाली की, मन अगदी प्रसन्न होतं. याचीच अनुभुती देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फ्रेंच सोशल मीडिया इन्फ्लुयसर फॅब्रिझियो विलारी मोरोनी (Fabrizio Villari Moroni) याचा एक व्हिडीओ सध्या अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. नोकरीच्या दडपणात गुदमरल्यासारखं वाटणाऱ्या मोरोनीची सुटका झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जो काही आनंद होता, तो पाहून तुमचं देखील मन भरून येईल. पावसाच्या सरी अंगावर झेलून मोरोनी याने आपला आनंद व्यक्त केला.  त्याच्या चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं आहे. मोरोनीने त्याच्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतो मोरोनी पाहुया...

मी नोकरी सोडली आहे... मी शेवटी नोकरी सोडली आहे... अखेर मी 9 ते 5 ची नोकरी सोडली. जेव्हा मी पहिल्यांदा ही नोकरी सुरू केली तेव्हा मला वाटलं होतं की मी नोकरीसोबतच कंटेंट क्रिएशनही करू शकेन, पण मी चुकीचा ठरलो. मी माझ्या क्षमतेचा अतिरेक केला होता, असं प्रांजल कबुली फेब्रीने दिली. अनेकांना हे समजायला वेळ लागतो की, जर तुम्ही अनेक गोष्टींसाठी कमिटेड असाल तर तुम्ही एका गोष्टीसाठी खरोखरच कमिटेड नसता, म्हणून मला एक पर्याय निवडावा लागला, असं मोरोनी म्हणतो.

पाहा Video

तुमच्यासाठी कंटेन्ट तयार करणं हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि ही एकमेव गोष्ट आहे जी मला खरोखर समाधानी करते. एखाद्याला हसवण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी, कोणत्या ना कोणत्या प्रकारे माझा कंटेन्स उपयुक्त आहे, असं अनेक लोकांनी सांगितलं. जेव्हा पॅरिसच्या रस्तावर तुम्ही माझं कौतूक करता तेव्हा मला जो आनंद मिळतो, तो शब्दात न व्यक्त करणारा असतो.  तुमच्या अपार प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. हे कधीच विसरता येणार नाही. ही एक सोपी निवड नव्हती, परंतु तुम्ही बघू शकता, यामुळे मला आनंद झालाय, असं मोरोनीने म्हटलं आहे.

दरम्यान, आगामी काळात लोकांसाठी खूप चांगला कंटेन्ट घेऊन येईल, असं आश्वान देखील मोरोनीने दिलंय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून हा व्हिडिओ जवळपास 80 लाख वेळा पाहिला गेला आहे आणि 4 लाखांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.