VIDEO: रस्त्यावरच तरुणींची तुफान हाणामारी, पोलीस कर्मचाऱ्याने फक्त एकच गोष्ट केली अन् सगळे पळाले

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये काही तरुणी रस्त्यावर लाथा-बुक्क्या घालत तुफान हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तरुणींची हाणामारी सुरु असतानाच एक पोलीस कर्मचारी तिथे पोहोचतो आणि असं काही करतो की, तरुणी हाणामारी सोडून पळ काढतात.   

शिवराज यादव | Updated: May 13, 2023, 02:06 PM IST
VIDEO: रस्त्यावरच तरुणींची तुफान हाणामारी, पोलीस कर्मचाऱ्याने फक्त एकच गोष्ट केली अन् सगळे पळाले  title=

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. हे व्हिडीओ कधी तुम्हाला हसवतात तर कधी आश्चर्यचकित करतात. सोशल मीडियाचा प्रभावही लोकांवर इतका आहे की, जेव्हा कधी एखादी घटना समोर घडते तेव्हा सर्वात आधी खिशातून मोबाइल काढून लोक शूट करणं सुरु करतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणी रस्त्यावर तुफान हाणामारी करताना दिसत आहे. तरुणी एकमेकींचे कपडे, केस ओढत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या तरुणी जणू काही एकमेकींचा जीवच घेण्याचा प्रयत्न करत होत्या.

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, एका कॅफेच्या बाहेर काही तरुणींमध्ये भांडण सुरु आहे. यावेळी तरुणी एकमेकींना वाईट पद्धतीने हाणामारी करत होत्या. लाथा, बुक्क्या मारत एकमेकींचे केस ओढत तरुणींची सुरु असलेली हाणामारी पाहण्यासाठी रस्त्यांवर लोकांचीही गर्दी झाली होती. पण याचवेळी तिथे एक पोलीस कर्मचारी येतो. तरुणींमध्ये सुरु असलेला हा हिंसाचार पाहून पोलीस कर्मचारी ना त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, ना त्यांना अटक करतो. पोलीस कर्मचारी त्यांच्यावर पेपर स्प्रे मारतो आणि तेथून बाजूला होतो. 

पेपर स्प्रे मारल्याने तरुणी घाबरतात आणि भांडण सोडून तेथून पळ काढण्यास सुरुवात करतात. यावेळी काही तरुणी डोळे चोळत पळतात तर काहीजण खोकत असल्याचं दिसत आहे. दरम्यान एका जागेवरील भांडण संपलं असलं तरी तरुणींचा दुसरा एक गट मात्र अद्यापही भांडत असतो. यानंतर पोलीस कर्मचारी त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्यावरही पेपर स्प्रे मारतो. यानंतर त्या तरुणीही भांडण सोडून तेथून पळ काढतात. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण मिसौरी येथील कंसास येथील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पोलीस कर्मचाऱ्याने ज्याप्रकारे प्रसंगावधान आणि संयम दाखवला आहे त्याचं लोक कौतुक करत आहेत. तर अनेकजण तरुणींच्या भांडणाची मजा घेत आहेत.