अचानक जेवण अडकल्यानं गुदमरला तरुण; अखेर वेटर आणि पोलिसांनी असा वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवायला आलेल्या ३८ वर्षीय ग्राहकाच्या घशात अन्न अडकते आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडतो.

Updated: Dec 5, 2021, 03:53 PM IST
अचानक जेवण अडकल्यानं गुदमरला तरुण; अखेर वेटर आणि पोलिसांनी असा वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

मुंबई : अनेकदा अन्न खाताना एखादा तुकडा घशात अडकतो तेव्हा बऱ्याचदा लोकांना ठसका लागतो किंवा श्वास घेण्याची समस्या उद्भवते. बऱ्याचदा काहीवेळाने लोकांना बरं वाटते, परंतु अशा परिस्थिती अनेकांचे प्राण देखील गेले आहे. अन्न श्वसननलिकेत अडकल्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हा धक्का बसेल. परंतु या व्हिडीओच्या माध्यमातून अशा परिस्थीतीत काय करावे याची माहिती तुम्हाला मिळत आहे. ज्यामुळे समजा एखाद्यासोबत असा प्रसंग घडला आणि तुम्ही तेथे उपस्थीत असाल, तर काय करावं याची तुम्हाला माहिती मिळेल.

ही घटना ब्राझीलमधील साओ पॉला येथील आहे. आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवायला आलेल्या ३८ वर्षीय ग्राहकाच्या घशात अन्न अडकते आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडतो. यानंतर जे काही घडते ते चमत्कारापेक्षा कमी नाही.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवताना बसलेल्या व्यक्तीच्या घशात काहीतरी अडकल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे व्यक्ती अस्वस्थ होते. मग तो बेशुद्ध होतो. यादरम्यान त्याच्या समोर बसलेल्या एका महिलेला काहीतरी विचित्र वाटत असल्याने जाणवते, ज्यामुळे ती त्याच्या टेबलाजवळ येते. दरम्यान इतर काही लोकही तिथे जमा होतात.

प्रत्येकजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ग्राहक प्रतिसाद देत नाही. यानंतर लोक वेटरला बोलावतात. त्यानंतर वेटर जे करतो हे पाहिल्यानंतर तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वेटर त्या व्यक्तीला मागून पकडतो आणि त्याला जोरात उचलून पुढून दाबतो. तो हे सारखं सारखं करत असतो. तेवढ्यात एक पोलीस अधिकारी तिथे येतो आणि तीच प्रक्रिया त्या व्यक्तीसोबत वेगाने करू लागतो. त्यानंतर या व्यक्तीच्या घशात अडकलेले अन्न खाली जाते आणि तो पुन्हा श्वास घेऊ लागतो. अशा प्रकारे वेटर आणि पोलीस दोघे मिळून या व्यक्तीचे प्राण वाचवतात.

गुडन्यूज कॉरस्पॉन्डंट नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओला अगदी 2 दिवसात आतापर्यंत 1 लाख 45 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1 हजाराहून अधिक लोकांनी ते लाइक केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, 'देवाचे आभार मानतो की, शेवटच्या क्षणी वेटरने या व्यक्तीचे प्राण वाचवले. अशा लोकांना माझा सलाम.' त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, 'वेटरचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, पण मला वाटते की पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा जीव वाचवण्यात मदत केली आहे.' आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'असे लोकच खऱ्या आयुष्यातील खरे हिरो असतात.'