Accident Video: देव तारी त्याला कोण मारी! 7 सेकंदात खेळ खल्लास, CCTV फुटेज पाहून डोकं होईल सुन्न

Car Accident Viral Video: र्जेंटिनामधील सुरक्षा फुटेजमध्ये सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात एक भीषण अपघात कैद झालाय आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. 

Updated: Jul 24, 2023, 08:58 PM IST
Accident Video: देव तारी त्याला कोण मारी! 7 सेकंदात खेळ खल्लास, CCTV फुटेज पाहून डोकं होईल सुन्न title=
Viral Video Of Car Accident

Viral Video Of Car Accident: देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अर्जेंटिनामधील सुरक्षा फुटेजमध्ये सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात एक भीषण अपघात कैद झालाय आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. भीषण अपघात अर्जेंटिनामधील (Argentina) ला प्लाटा शहरातील असून ला प्लाटा सिटी कौन्सिलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

कार अपघाताच्या (Car Accident) फुटेजमध्ये दोन कारचा समावेश असलेल्या घटनेतून एक महिला थोडक्यात कशी बचावली. थोडा जरी पाय इकडं किंवा तिकडं असला तर महिलाचा मृत्यू अटळ होता. अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स प्रांताची राजधानी ला प्लाटा येथे 19 जुलै 2023 रोजी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील एका चौकात एक महिला चौक पार करत होती. काळ्या पोशाखात एक महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. दोन वेगवान वाहने एकमेकांवर आदळल्याचा क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

आणखी वाचा - IndiGo फ्लाईटमध्ये प्रवास करत होता कारगिल युद्धातील हिरो, पायलटने सर्वांसमोर असं काही केलं की... पाहा Video

लाल दिवा असताना देखील दोन काळ्या रंगाच्या एसयूव्ही त्यांचा सामान्य मार्ग बदलून एकमेकांवर आदळल्या. त्यावेळी महिला थोडक्यात बचावली. दोन्ही गाड्या अचानक आल्याने महिलाला धक्का बसला. तिने थोडं पुढं जात आपला जीव वाचवला. त्यावेळी एक गाडी पुढं जाऊन बसला धडकली तर दुसरी गाडी रस्त्याच्या मधोमध थांबली. 7 सेकंदात हा सर्व प्रकार घडला. अपघातानंतर अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला.

पाहा Video

दरम्यान, रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांनी महिलेला धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी कार चालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण हाताळलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सावध गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे. काही सेकंदाची घाई केल्याने जीव जाऊ शकतो, याची प्रचिती देणारा हा व्हिडिओ आहे. घरचे वाट पाहत असतील, याचं भान ठेऊन गाडी चालवली पाहिजे, असा सल्ला नेटकरी देत आहेत.