बेड्या असूनही पोलिसांच्या चालत्या वाहनातून कैदी फरार, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

हा कैदी पोलिसांच्या समोरच पोलिसांच्या गाडीतून उतरला आणि एका गल्लीच्या दिशेने धावू लागला. 

Updated: Jan 8, 2022, 06:41 PM IST
बेड्या असूनही पोलिसांच्या चालत्या वाहनातून कैदी फरार, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद title=

मुंबई : गेल्या काही वर्षांत तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या, पाहिल्या किंवा वाचल्या आहेत. अशातच एक अशी घटना नुकतीच समोर आली आहे. जी धक्कादायक आहे. सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कैदी पोलिसांच्या ताब्यातुन पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ज्याचे फुटेज आता व्हायरल होत आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे. हा कैदी पोलिसांच्या समोरच पोलिसांच्या गाडीतून उतरला आणि एका गल्लीच्या दिशेने धावू लागला. तसेच हा कैदी जेव्हा गाडीमधून पळून जात होता. तेव्हा त्याच्या हातात बेड्या घातल्या होत्या.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या गाडीतून उडी मारताना दिसत आहे, त्यानंतर तो रस्त्यावर धावू लागतो. परंतु लोकांना हा प्रश्व पडला आहे की, हा कैदी जेव्हा गाडीतून पळून जाऊ लागला तेव्हा पोलिसांना कसा काय दिसला नसेल?

व्हायरलहॉगने हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. ही घटना 28 डिसेंबर 2021 रोजी ब्राझीलमधील अलागोआ नोव्हा, पराइबा येथे घडली.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, "कैदी पोलिसांच्या वाहनातून पळून जातो," हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केल्यापासून जवळपास 40 हजार वेळा पाहिला गेला आहे.

अपेक्षेप्रमाणे ही घटना कॅमेऱ्यात समोर आल्यानंतर प्रेक्षकही थक्क झाले. एका वापरकर्त्याने लिहिले, "त्यांनी खरोखरच त्याला व्हॅनच्या मागील बाजूस हातकडी लावली होती का?" एका वापरकर्त्याने त्या व्यक्तीच्या सुटकेचे कौतुक केले आणि लिहिले, "हुशारीने पळून जाण्यात तो यशस्वी ठरला... ."

स्थानिक वृत्तानुसार, तो माणूस पोलिसांच्या वाहनाचा दरवाजा उघडण्यात यशस्वी झाला आणि तो पळून गेला. तो गाडीतून उडी मारून रस्त्याच्या मधोमध उभा राहिला आणि जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. त्यामुळे रीअरव्ह्यू मिररमध्ये पोलिसांना ते लक्षात आले नाही आणि गाडी पुढे निघून गेली. एका अहवालानुसार, पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतरच पोलिसांना हा कैदी पळून गेला असल्याची माहिती मिळाली, ज्यानंतर पोलिस देखील विचारात पडले.

अद्याप कैदी पकडला गेला नाही. कैदी वाहनातून कसा पळून गेला, याचा तपास सुरू करण्यात आल्याचे सिव्हिल पोलिसांचे म्हणणे आहे. गाडीच्या डब्याला कुलूप लावण्याच्या ठिकाणी काही तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पोलिसांनी सांगितले आहे.