Eiffel Tower Model bikini shoot : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर जगभरात एकाच तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. जगभरातील तरुण (youth) वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. या तरुणीने (girl Video) जे कृत्य केलं आहे ते पाहून तरुणांनी कपाळावर हात मारुन घेतला आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Video) धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी काळा रंगाचं ओव्हर कोट घालून आहे. ही तरुणी जगातील प्रसिद्ध आयफेल टॉवरवर समोर असं काही कृत्य करते की हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. या तरुणीने चक्क आयफेल टॉवरसमोर आपला कोट काढून टाकते आणि ती अर्धनग्न होते. एवढंच नाही तर या तरुणीसोबत अजून एक तरुणी आहे तिने देखील हे कृत्य केलं आहे. त्यानंतर तरुणींना पाहण्यासाठी एकच गोंधळ होतो.
तुम्ही ही हे पाहून अवाक् झाले असाल, पण थांबा कोण आहेत या तरुणी आणि त्यांनी का केलं असं कृत्य त्याबद्दल आम्ही सांगतो. तर या तरुणी ब्राझिलमधील (Brazil) दोन मॉडेल (model) आहेत. एका बिकिनीच्या जाहिरातीसाठी त्या पॅरिसच्या आयफेल टॉवर इथे आल्या होत्या. जेव्हा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर (Instagram)पोस्ट करण्यात आला त्यानंतर जगभरात सगळ्यांचा भुवया उंचावल्यात.
मॉडेलच्या या कृत्यानंतर पोलिसांनी जवळजवळ या दोघींना अटक करण्याच्या तयारी होते. मात्र पोलिसांनी त्यांना समज दिली आणि त्यांना अंग झाकण्यास सांगितले. पर्यटन स्थळावर अर्धनग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास मनाई आहे. दरम्यान सोशल मीडियावर मॉडेलचा बिकिनी फोटोशूट मात्र गाजतोय.