बाहेरुन पत्र्याचं घर, आतलं दृष्य थक्क करणारं... 'या' मुलीचा Video होतोय व्हायरल?

Viral Video : या तरुणीच घर बघून अवाक् व्हाल, कारण बाहेरून साधे वाटणारे घराच्या आतल्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला धक्काच बसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

नेहा चौधरी | Updated: Jun 18, 2024, 03:55 PM IST
बाहेरुन पत्र्याचं घर, आतलं दृष्य थक्क करणारं... 'या' मुलीचा Video होतोय व्हायरल? title=

Trending Video : सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. यात असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुठल्या व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये येईल याचा काही नेम नाही. सध्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या तरुणीने तिचं घर या व्हिडीओमध्ये दाखवलं आहेत. खरं तर साधे आणि कल्पनापलिकडील या घराची रचना आहे. नेटकरी तिचं घर पाहून अवाक् झाले आहेत. बाहेरून पत्र्याचं घर अगदी छोट एका डब्यासारखं दिसणारं हे घरं पाहून तुमचेही डोळे चमकतील. 

बाहेरुन दिसणारे हे पत्र्याचं घर आतून नेमकं कसं असेल याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाहीत. या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाइक आणि व्ह्यूज मिळत आहेत. या तरुणीचं घर आतून कसं आहे, आपणही पाहूयात. 

बाहेरून सामान्य घर, आतून…

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी अगदी सामान्य दिसणाऱ्या घराबाहेर उभी आहे. हे घरही शेतात किंवा जंगलात बांधलंय असं वाटतंय. बाहेरून पाहिल्यावर आत राहण्याची व्यवस्था असेल याची कल्पनाही आपण करु शकत नाही. पण तरुणी आतून जेव्हा घर दाखवते आपण आश्चर्यचकित होतो. तिथले दृश्य पूर्णपणे वेगळे असून कल्पनापलिकडलं असतं. छोट्या जागेतही किचन, बेडरूम आणि टॉयलेट-बाथरूमची याची योग्य आणि खूप चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व काही इतके स्वच्छ आणि सुबकपणे ठेवले आहे की तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल. 

खरं तर एवढ्या छोट्या जागेत इतक्या सगळ्या गोष्टी कशा बसल्यात हे पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तिने छोट्या जागेतही आपल्या गरजा पूर्ण केल्या आहेत. खरं तर छोट्या जागेत वस्तू आणि घर कसं सजवायचं याचा हा व्हिडीओ म्हणजे उत्तम उदाहरण आहे. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कमी जागेत संसार थाटावा लागतो. अशावेळी कुठे काय ठेवायचं कशी जागा करायची असा प्रश्न पडतो. पण हा व्हिडीओ पाहून इतक्या कमी जागेत एवढंच सुंदर आणि किचन, बेडरूम आणि टॉयलेट-बाथरूमची याची योग्य होऊ शकते हे पाहून आश्चर्य वाटतं. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अल्टरहाऊस नावाच्या अकाऊंटवरून खूप प्रसिद्ध आहे. त्यावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईक केलंय. व्हिडीओवर कमेंट करताना लोकांनी लिहिलंय की, घर खूप सुंदर आहे पण काही यूजर्सनी त्याच्या ताकदीबद्दल शंका व्यक्त केलीय.