VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : पालक आणि त्यांचा दत्तक मुलाची ही पहिल्या भेटीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचा हृदयाला स्पर्श करतोय. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 

नेहा चौधरी | Updated: May 25, 2024, 04:23 PM IST
VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच  title=
Watch this heart touching video that brings a couple to tears after seeing their adopted child viral video Trending now

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात तर काही अगदी हृदयाला स्पर्श करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. जो सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये पालक त्यांच्या दत्तक मुलाच्या भेटीला गेला असतानाच्या भावना कैद झाल्या आहेत. 

आई होणं यापेक्षा मोठं सुख नसतं असं आपण प्रत्येक जण म्हणतो. पण या देशात अशा अनेक महिला आहे ज्यांना काही कारणामुळे या सुखापासून वंचित राहावं लागतं. लग्नानंतर पती पत्नीचं नात्याचा फुल आणि प्रेमाचं बंध अजून मजबूत करणारा हा दुवा प्रत्येक जोडप्याला हवा हवासा असतो. त्या तान्हुलाचं आगमनाने जणू आयुष्याला नवी दिशा मिळते. पालकांचं प्रत्येक गोष्टी ही त्या बाळाच्या अवतीभोवती फिरतं. 

पण मातृत्व आणि पालक होण्याच सुख प्रत्येकाच्या नशिबात नसतं. यामागील कारणंही वेगवेगळी असतात. हे दु:ख सहन सहन करणंही कठीण असतं. असं वाटत जसं आयुष्य तिथेच थांबलं आहे. अनेक पालक डिप्रेशनमध्ये जातात. पण काहीच पालक यातून मार्ग काढता आणि ज्या मुलांच्या आयुष्यात आई वडिलाची सावली नसते. 

कसं असतं ना कोणाला पालक होण्याच सुख नाही तर कोणाजवळ आई वडिलांचं प्रेम नाही. या व्हिडीओमधील या जोडप्यांनी एकमेकांच्या आयुष्यातील ती कमी पूर्ण करुन एक सुखी आणि आनंदी आयुष्याची सुरुवात केली. या व्हिडीओमधील कपल जेव्हा पहिल्यांदा आपल्या दत्तक मुलाला पाहतं तेव्हा त्यांना अश्रू अनावर होतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचंही डोळे पाणावले. 

दत्तक पालक त्यांच्या मुलाला पहिल्यांदा भेटतात या कप्शन खाली तो व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉमवरील इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. एका मुलाखतीत या व्हिडीओमधील आईने आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाली की, 'मला काय वाटतं हे नेमकं मला सांगता येणार नाही. या दिवसाची आम्ही इतकी वाट पाहिली की, हा फोन कधीच वाजणार नाही असंच वाटत होतं. पण शेवटी तो फोन आला आणि आमची वेळ आली. तो मुलगा होता. तेव्हापासून आमच्यामधील प्रेम अधिक वाढलं.'

या व्हिडीओ 17 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडिया कमेंट बॉक्समध्ये भावनिक प्रतिसाद आल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'वडिलांच्या प्रतिक्रियेने मला अश्रू अनावर झाले. किती खास क्षण आहे.' आणखी एक म्हणाला, 'त्या माणसाने आपले संपूर्ण जग धरून ठेवलंय आणि तो खूप आनंदी दिसतोय.'