वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येऊन नव्या राष्ट्राध्यक्षांना जनतेन पसंतीही दिली. मतपेटीच्या माध्यमातून जनतेनं जो बायडन यांच्यावर विश्वास दाखवल्याचं पाहायला मिळालं. पण, US Presidential election च्या याच निकालावर अद्यापही मावळते राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांचा पूर्ण विश्वास मात्र बसलेला नाही. मुळात आपला पराभवच त्यांनी स्वीकारलेला नाही, हेच त्यांच्या काही कृतींतून पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ याचीच प्रचिती देत आहे. ज्यामघ्ये ट्रम्प चक्क एका पत्रकारावरच संतापल्याचं दिसत आहे. निवडणुकीत चुकीच्या मार्गांचा अवलंब केल्यासंबंधीचा एक प्रश्न विचारला असता ट्रम्प यांचा पारा चढला आणि त्यांनी सदर पत्रकाराला खडे बोल सुनावले असंच या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार Reuters च्या White House correspondent Jeff Mason यांनी ट्रम्प यांना एक प्रश्न केला. या प्रश्नाचं उत्तर देत, जर बायडन यांना निवडणुकीच्या निकालांमध्ये विजयी घोषित करण्यात आलं असेल, तर ही एक चूकच आहे; असं ते म्हणाले. याच प्रश्नाला जोडून त्यांना आणखी काही विचारलं असता आणि कमी तुल्यबळ उमेदवार म्हणून उल्लेख होताच ट्रम्प यांचा संताप अनावर झाला.
JUST IN: President Trump snaps at reporter objecting to the President's false claims about the election: "You're just a lightweight. Don't talk to me that way. I'm the President of the United States. Don't ever talk to the President that way." pic.twitter.com/RbTKItjs9L
— The Hill (@thehill) November 26, 2020
'माझ्याशी असं बोलायचं नाही. मी America अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. राष्ट्राध्यक्षांशी केव्हाही असं बोलू नका', असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा अनेकांनीच त्यावर व्यक्त होत माध्यमांप्रती ट्रम्प यांची वागणूक अधोरेखित करत त्यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.