मुंबई : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर एका घर मालकाने आपल्या घरी भाड्याने राहणाऱ्या महिलेचे फोटो सोशल मीडियावर पाहिले ज्यामुळे त्याने, तिच्या घराचं भाडं वाढवलं आहे. काही वेळा सुंदर महिलांना पाहून अनेक लोक पैसे कमी करतात. परंतु या व्यक्तीने तर आपल्या घराचं भाडं वाढवलं, जे ऐकून सर्वांनाच प्रश्न पडला की, नक्की असं काय झालं असावं.
खरं तर या व्यक्तीने सोशल मीडियावर आपल्या घरी भाड्याने राहाणाऱ्या महिलेचा फोटो पाहिला, ज्यानंतर त्याने या महिलेच्या घराचं भाडं दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. आता तुम्हाला असं वाटत असेल की, नक्की त्या फोटोत असं काय असावं की, महिलेचं घरभाडं दुप्पट झालं असावं?
वास्तविक, ही महिला एका वेबसाइटवर खूप लोकप्रिय आहे, जिथे ती तिचे इंटिमेट फोटो शेअर करते. महिलेच्या घर मालकाने हे फोटो ऑनलाइन पाहिले, तसेच त्याने तिच्या वेबसाइटवर जाऊन देखील तिचे व्हिडीओ पाहिले, ज्यानंतर त्याने भाडं वाढवण्याचा निर्णय घेतला.
या महिलेचे नाव रोमी चेस आहे. ती 29 वर्षाची आहे. ती अमेरिकेतील मियामी (फ्लोरिडा) येथे एका फ्लॅटमध्ये राहत होती. या फ्लॅटमध्ये ती वर्षभर राहिली पण त्यानंतर घरमालकाने भाडे वाढवले.
यापूर्वी ती एका महिन्याचे सुमारे १ लाख ७५ हजार भाडे भरत होती, तर घरमालकाने ते वाढवून ३ लाख ६६ हजारांवर केलं आहे. ती ज्या फ्लॅटमध्ये राहात होती त्या फ्लॅटमध्ये 4 बेडरूम्स होत्या. म्हणून या घराचं भाडं जास्त होतं.
'गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फ्लॅट पाहण्याच्या बहाण्याने घरमालक अचानक आला, त्यावेळी तो माझ्याकडे एकटक पाहत होता.' घरी आल्यावर तो फक्त माझ्याकडेच पाहत होता. यादरम्यान तो म्हणाला, मला तुझे इंस्टाग्राम अकाउंट सापडले आहे, तू ज्या वेबसाइटवर काम करत आहेस त्या सर्व लिंक्सही मी पाहिल्या आहेत. त्यामुळे आता तुला भाडं वाढवून मला द्यावं लागेल.