युक्रेनवर का केला हल्ला? मुळचे भारतीय रशियाचे खासदार डॉ. अभय कुमार सिंह यांचा खुलासा

पुतिन यांच्या पक्षाचे खासदार डॉ. अभय कुमार सिंह यांनी सांगितले हल्ल्यामागचं कारण...

Updated: Mar 2, 2022, 05:01 PM IST
युक्रेनवर का केला हल्ला? मुळचे भारतीय रशियाचे खासदार डॉ. अभय कुमार सिंह यांचा खुलासा title=

मुंबई : यूक्रेन - रशिया संघर्ष अजूनही सुरुच आहे. रशियाकडून यूक्रेनवर हल्ले होत आहेत. तर यूक्रेनही रशियाच्या हल्ल्यांना उत्तर देत आहे. अनेक देशांनी रशियाला हल्ले रोखण्याचं आवाहन केलं आहे. यूक्रेनवर रशियाला केलेला हल्ला योग्य असल्याचा भारतीय वंशाचे रशियातील खासदार डॉ. अभय कुमार सिंह यांनी म्हटलं आहे. यूक्रेनला बराच वेळ देण्यात आला होता. त्यांनी ही कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे. (Why Russia attack on Ukraine)

यूक्रेनमध्ये रशियाकडून अजूनही हल्ले होत आहेत. गेल्या 7 दिवसांपासून दोन्ही देश लढत आहेत. बुधवारी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे यातून काय तोडगा निघतो. हे पाहावं लागणार आहे. 

पुतिन यांच्या पक्षाचे खासदार डॉ. अभय कुमार सिंह हे रशियातील शहर कुर्स्कचे खासदार आहेत. रशियातील 'डेप्यूटॅट' (Deputat) भारतातील एका खासदाराच्या बरोबरीचा असतो.

सिंह यांनी म्हटलं की, जर चीनने बांगलादेशमध्ये आपल्या सैन्याची छावणी बांधली तर भारत यावर काय प्रतिक्रिया देईल.? भारताला देखील हे आवडणार नाही. तसेच नाटो देखील रशियाविरोधात बनवला गेला होता आणि सोवियत संघ तुटल्यानंतर देखील हे वेगळे झाले नव्हते. हे हळूहळू रशियाजवळ येत होते. 

यूक्रेन नाटोमध्ये सहभागी झाली असता तर चे आमच्या आणखी जवळ आले असते. कारण यूक्रेन आमच्या शेजारील देश आहे. राष्ट्राध्य व्लादिमीर पुतिन आणि रशियाकडे यावर कारवाई शिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे यूक्रेनवर हल्ला करावा लागला.

डॉ. सिंह यांनी यूक्रेनवर अणुबॉम्ब हल्ल्याची शक्यता मात्र फेटाळून लावली. अणु अभ्यास हा फक्त रशियाविरोधातील हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी होता. त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. जर कोणता देश रशियावर हल्ला करतो तर रशिया त्याला उत्तर देईल. 

डॉ. अभय कुमार सिंह मूळचे पटनाचे आहेत. 30 वर्षापूर्वी ते 1991 मध्ये मेडिकलच्या अभ्यासाठी रशियाला गेले होते. तेथेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते डॉक्टर बनल्यानंतर पटनाला आले. त्यानंतर ते पुन्हा रशियाला गेले. तेथे त्यांनी स्वत:चा औषधांचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर रियल इस्टेट क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं.