या ४ कारणांमुळे मसूदला पाठिशी घालत होता चीन

पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना चीनचं छुपं समर्थन?

शैलेश मुसळे | Updated: May 3, 2019, 01:42 PM IST
या ४ कारणांमुळे मसूदला पाठिशी घालत होता चीन title=

मुंबई : चीनने पाकिस्तान अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानला नाराज करु इच्छित नव्हता. तसेच भारतात शांती असावी हे चीनला मान्य नाही. त्यामुळे चीन पाकिस्तानला मदत करतो. चीनने संयुक्त राष्ट्रात ४ वेळा मसूद अजहरला वाचवलं. मागील १० वर्षात चीनने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करु नये म्हणून अडथळा आणला. भारतासह जेव्हा संपूर्ण जग दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला तेव्हा मात्र चीनला झुकावं लागलं.

पाकिस्तानात मोठी गुंतवणूक

पाकिस्तानात चीनने सीपॅकमध्ये ५५ बिलियन डॉलर म्हणजेच ३.८ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. इतर प्रोजेक्टमध्ये चीनची जवळपास ३.२ लाख कोटींची गुंतवणूक आहे. पाकिस्तानातील अनेक परदेशी कंपन्यांपैकी सर्वाधिक ७७ कंपन्या चीनच्या आहेत. ग्वादर पोर्टजवळ चीन आपलं शहर बनवत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात चीनने गुंतवणूक केली आहे.

भारताला पुढे न येऊ देणे

संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया खंडात चीनला टक्कर देणारा फक्त भारतच आहे. चीन भारताला सर्वात मोठा आर्थिक स्पर्धेक मानतो. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे आपसात लढत राहावे आणि त्यामुळे भारताचा विकास होऊ नये अशी चीनची छुपी इच्छा आहे.

चीनच्या अत्याचारांवर पाकिस्तान गप्प

स्वत:ला मुस्लिमांचा हित जोपसणारा म्हणणारा पाकिस्तान काश्मीरमध्ये युवकांना भडकवण्याची कामं करतो. मात्र चीनमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्य़ाचाराबाबत एकही शब्द बोलत नाही. चीनच्या उईगर मुस्लिमांवर अनेक प्रकारच्या बंदी आहे. पण पाकिस्तान यावर कधीच बोलत नाही. सर्व मुस्लीम देशांपैकी फक्त पाकिस्तानच या बंदीचं समर्थन करतो. त्यामुळे चीनला पाकिस्तानची गरज वाटते.

भारताचं वर्चस्व वाढल्याने चीन अस्वस्थ

मागील एक दशकात भारताने आर्थिक आणि कूटनीती स्तरावर जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारत-अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. चीनमात्र अमेरिकेच्या विरोधात आहे. त्यामुळे चीन मसूदला हत्यार बनवून भारता विरुद्ध कारवाया करण्यासाठी छुपं समर्थन करतो.