Why dogs Pant with Tongue: जीभ बाहेर काढणारे Pet Dogs क्यूट दिसतात खरं; पण त्यामागे लपलंय गंभीर कारण

Summer Health Tips for Dogs: उन्हाळ्यात तुमचे पेट डॉग्स (Pet Dogs) हे जर का जास्त प्रमाणात तोंडातून जीभ बाहेर काढत असतील तर तुम्हाला त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा जाणून घेऊया की, मुळात कुत्रे हे आपली जीभ बाहेर का काढतात (Why Dogs Pant in Summer) आणि त्यामागे नक्की कारण कोणत आहे? 

Updated: Mar 21, 2023, 11:39 AM IST
Why dogs Pant with Tongue: जीभ बाहेर काढणारे Pet Dogs क्यूट दिसतात खरं; पण त्यामागे लपलंय गंभीर कारण title=
why do dogs stick their tongue out and pant know the reason and health importance of dogs

How To Care For Dogs In Summer: पाळीव प्राण्यांच्या अनेक सवयी असतात. आपल्याला कधीकधी त्यांच्या वर्तनाचा (Dog Pants) पत्ताच लागत नाही. आपण अनेकदा पाहतो की कुत्रे हे आपली जीभ अनेकदा बाहेर काढत असतात. परंतु आपल्याला याचा काहीच अंदाज येत नाही की ते असं का बरं (Why do Dogs Pant in Summer) करत असतील. परंतु यामागे एक शास्त्रीय कारण तर आहेच परंतु त्याचसोबत त्यामागे कुत्र्यांसाठी एक गंभीर समस्याही आहे. तुमच्या घरी तुमचा स्वीटू, टॉमी, बबलू अशा नावाचे पेट डॉग्स (पाळीव कुत्रे) असतीलच नाही का? उन्हाळ्यात आपल्या पेट्सची जास्त काळजी घ्यावी लागते त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. (why do dogs stick their tongue out and pant know the reason and health importance of dogs)

उन्हाळ्यात पाळीव कुत्र्यांची काळजी ही अधिक घ्यावी लागते. सोबतच त्यांना काही गंभीर समस्याही जडू शकतात. त्यामुळे तुमचा पेट सतत जीभ बाहेर काढत असेल तर जाणून घेऊया की यामागचे कारण नक्की कोणते आहे. पाळीव प्राण्यांच्या वर्तनात अनेकदा बदल होताना दिसतात. कधी कधी आपल्याला कळतच नाही की आपला पेट आज इतका का भुंकतो (Summer Health Tips For Dogs) आहे? कधी ते काहीच खात नाहीत अथवा पित नाही, त्यांची सतत काही ना काहीतरी अवस्थ हालचाल ही सुरूच असते, त्यांना कधी कुठली जागा आवडत नाही तर कुठेतरी एके ठिकाणी ते शांत बसून असतात. तेव्हा आपल्यालाही त्याकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. कारण त्यांच्या बदलत्या वर्तनावरून त्यांच्या आरोग्यात काही बदल होतायत का हेही जाणणे आवश्यक असते. 

कुत्रे जीभ का बाहेर काढतात? 

कुत्र्यांच्या उन्हाळ्यात अधिक त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरातून घाम बाहेर (Sweating in Dogs) निघण्यासाठी तशा ग्रंथी शरीरात असतात. परंतु कुत्र्यांमध्ये अशा ग्रंथी सापडत नाहीत. त्यामुळे आपल्या शरीरातील तापमान व्यवस्थित करण्यासाठी तोंडाबाहेर जीभ काढत तापमान नीट ठेवणे आवश्यक ठरते म्हणून ते आपली जीभ बाहेर काढतात. 

अशावेळी त्यांना जर का जास्त त्रास होत असेल तर त्यासाठी त्यांना थंड (How to Keep Your Dogs Cool) ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे. तेव्हा तुमच्या डॉगसाठी त्याला थंड ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तेव्हा या समस्येकडे नीट लक्ष द्या दुर्लक्ष करू नका आणि आपल्या पेटची चांगली काळजी घ्या.