अंड्याच्या या फोटोची जगभरात चर्चा, पण का? या मागील कारण धक्कादायक

गेल्या तीन वर्षांपासून, या फोटोने सर्वाधिक पसंती मिळवली आहे.

Updated: Jan 8, 2022, 09:43 PM IST
अंड्याच्या या फोटोची जगभरात चर्चा, पण का? या मागील कारण धक्कादायक title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो पोस्ट व्हायरल होतात, पण तुम्हाला माहित आहे का की आतापर्यंत कोणत्या पोस्टला सर्वात जास्त लाईक मिळाले आहे? हा एक असा फोटो आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल आणि तुम्ही विचार करत राहाल की, या फोटोला कसं काय इतके लाईक्स मिळू शकतात. या फोटोने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) मध्ये देखील आपले नाव नोंदवले आहे.

हा फोटो आहे एका अंड्याचा. लोकांना या अंड्याचा फोटो खूप आवडला, जो आतापर्यंतचा सर्वात जास्त लाइक मिळालेला सोशल मीडियावरील पोस्ट ठरला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून, या फोटोने सर्वाधिक पसंती मिळवली आहे. या पोस्टने आता अनेकांची उत्सुकता वाढवली आहे, कदाचित हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्याला लाईक करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ट्विट केले की, 'वर्ल्ड रेकॉर्ड एग वर आजपासून तीन वर्षांपूर्वी पोस्ट करण्यात आली होती आणि आजही 55.5 दशलक्ष लाईक्ससह इंस्टाग्रामवर सर्वाधिक पसंत केलेला हा फोटो ठरला आहे.'

2019 मध्ये पोस्ट केलेले चित्र

GWR ने अंड्यांबद्दलच्या ब्लॉगची लिंक देखील शेअर केली आहे. खरेतर 2019 मध्ये हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. ज्यानंतर या फोटोने रेकॉर्ड मोडला आहे. या फोटोपूर्वी काइली जेनरच्या पोस्टला सर्वाधिक पसंती मिळाली होती, ज्याची जागा आता या अंड्याच्या पोस्ट नं घेतली आहे.

आश्चर्याचं म्हणजे  world_record_egg नावाचे पेज कोणालाही फॉलो करत नाही. पण तरीही यावरती 4.8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच यावरती फक्त एकच फोटो पोस्ट करण्यात आला आहे, ती या अंड्याची.