#Father's Day : फादर्स डे साजरा करण्यामागचा इतिहास ठाऊक आहे का?

जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. 

Updated: Jun 20, 2021, 12:11 PM IST
#Father's Day : फादर्स डे साजरा करण्यामागचा इतिहास ठाऊक आहे का? title=

मुंबई : जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. तुम्ही देखील सकाळी उठल्यावर वडिलांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील. मात्र तुम्हाला माहित आहे का फादर्स डे नेमका का साजरा करतात? याबाबत फार कमी जणांना माहिती असण्याची शक्यता आहे. तर या आज जाणून घेऊया फादर्स डे साजरा का करतात.

फादर्स डे मागील इतिहास

सोनोरा स्मार्ट डोड हिने 1910 मध्ये साजरा केलेला फादर्स डे अधिकृत पहिला मानला जातो. सोनोरा स्मार्ट डोड लहान असताना तिच्या आईचं निधन झालं होतं. यानंतर तिचा सांभाळ संपूर्णपणे तिचे वडील विलियम स्मार्ट यांनी केला. यानंतर एकदा ती चर्चमध्ये गेली असता आई या विषयावर माहिती देण्यात आली. यामुळे सोनोरा फारच प्रभावित झाली.

सोनेरा मोठी झाल्यानंतर आईप्रमाणे वडिलांसाठी एक खास दिवस असावा असं तिच्या मनात आलं. आणि या पार्श्वभूमीवर तिने फादर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिचे वडील विलियम स्मार्ट यांच्या जन्मदिनी म्हणजे 5 जूनला तिने Father’s Day साजरा केला.

1924 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती कैल्विन कोली यांनी वडिलांसाठी सोनेराने साजरा केलेल्या फादर्स डे या संकल्पनेला अधिकृतरित्या मंजूरी दिली. कालांतराने 1966 मध्ये राष्ट्रपती लिंडन जॉनसन यांनी दरवर्षी जून महिन्याच्या तिसरा रविवारी फादर्स डे साजरा केला जाईल अशी घोषणा केली.

तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारख्या देशात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. तर ब्राझीलमध्ये ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.