पुढे दरी आणि मागे मृत्यू... हरणांच्या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओमध्ये दोन तरस आणि तीन हरीण दिसत आहेत. हे सगळे डोंगराच्या टोकावर आहेत.

Updated: Jun 28, 2022, 09:48 PM IST
पुढे दरी आणि मागे मृत्यू... हरणांच्या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : जंगलात राहाणे प्राण्यांसाठी सोपं नाही. इथे प्रत्येक प्राणी आपलं पोट भरण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. त्यामुळे कधी कोणत्या प्राणाचे प्राण जातील किंवा कोणता प्राणी मृत्यूच्या दारातून कसा वाचेल, हे काही सांगू शकत नाही. परंतु शिकार करणं हा नियम जंगलात कायम आहे. जर तुम्ही तुमच्या लहानपणी डिस्कव्हरी चॅनल्स पाहिलं असेल तर तुम्हाला वन्य प्राण्यांचे जीवन किती कठीण असते.

यासंबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगलासारख्या वातावरणात तुम्हाला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. असाच हा व्हिडीओ आहे.

या व्हिडिओमध्ये दोन तरस आणि तीन हरीण दिसत आहेत. हे सगळे डोंगराच्या टोकावर आहेत. यामध्ये तरस हरणाचा शिकार करण्यासाठी तेथे आला आहे. परंतु तिन्ही हरीण हे डोंगराच्या टोकावर आपला जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हे तीन हरीण इतकी वाईटरित्या अडकले आहेत की, त्यांची अवस्था पाहून तुम्हालाही वाईट वाटू लागेल. एकीकडे खोल दरी आणि दुसरीकडे शिकारी. या हरणांची नाचक्की झाली आहे. या हरणांना दोन्हीकडे त्यांचं मरणंच दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परंतु हरणांनी आपले प्राण वाचवण्यासाठी युक्ती वापरली आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक हरणाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत, तर काहीजण व्हिडीओ बनवणाऱ्याला हरणांना वाचवण्याचा सल्ला देत आहेत.

आता या हरीणांचा जीव वाचला आहे की नाही हे कळलेलं नाही. परंतु या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.