विषारी नागापासून तयार होणारी वाईन

विषारी सापांपासून वाईन तयार केली जाते.

Updated: Jun 27, 2019, 08:19 PM IST
विषारी नागापासून तयार होणारी वाईन

मुंबई : साप म्हटलं तर भल्याभल्यांना भीती वाटते. पण याच विषारी सापांपासून वाईन तयार केली जाते हे सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. विषारी नागांपासून वाईन तयार केली जाते. चीन आणि व्हियतनाममध्ये विषारी सापांपासून दारू तयार करण्याची परंपरा आहे. अनेक मद्यशौकीन खास स्नेक वाईन पिण्यासाठी चीन किंवा व्हिएतनामचा दौरा करतात. 

स्नेक वाईन तयार करताना त्याचं विष आणि रक्त वाईनमध्ये मिसळलं जातं. पण सापाच्या विषाचा पिणाऱ्यावर विपरीत परिणाम होत नाही. अनेक पर्यटक स्नेक वाईनचा आनंद घेताना दिसतात. या वाईनमध्ये अनेक औषधी वनस्पतींचाही समावेश केला जातो. चीनमध्ये दहाव्या शतकात स्नेक वाईन तयार केल्याचा उल्लेख सापडतो. स्नेक वाईन हिची तीव्रता इतर वाईनपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येतं. पण ही वाईन तरूणांनी खूप जास्त प्रमाणात पिणं धोक्याचं असल्याचं जाणकार सांगतात. 

स्नेक वाईनच्या अतिसेवनानं तरूणांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रसंगी नपुंसकताही येऊ शकते. त्यामुळं चवीपुरती स्नेकवाईन घ्यायला हरकत नाही. स्नेकवाईन जास्त पिणं धोक्याचच आहे. साप जिवंत असतानाही चांगला नाही आणि मेल्यानंतरही तो चांगला नाही असं म्हणायला हरकत नाही.