महिलेने 25 वर्ष नखेच कापली नाही, 42 फूट लांब नखे पाहून तुम्हाला ही धक्का बसेल

कोणाला काय छंद असेल याचा नेम नसतो. अशीच एक महिला आहे. जीने 25 वर्ष आपली नखे कापली नाहीत.

Updated: Aug 7, 2022, 04:50 PM IST
महिलेने 25 वर्ष नखेच कापली नाही, 42 फूट लांब नखे पाहून तुम्हाला ही धक्का बसेल title=

मुंबई : जगात अनेक प्रकारची लोकं आहेत. ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होत असतात. सोशल मीडियावर अशा लोकांची देखील खूपच चर्चा असते. अशीच एक महिला आहे डायना आर्मस्ट्राँग. या महिलेच्या नावावर एक अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. डायनाच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट 10 इंच आहे. दोन्ही हातांची सर्वात लांब नखे असलेली महिला बनली आहे.

या महिलेच्या नखांची लांबी 'डबल डेकर बस'पेक्षा जास्त आहे. डायना मिनियापोलिस, मिनेसोटा (यूएसए) येथील रहिवासी आहे. अखेर नखे लांब का असतात या मागची गोष्टही त्यांनी सांगितली.

63 वर्षीय डायनाने 25 वर्षांपासून नखे कापली नाहीत. लांब नखांनी ती सामान्यपणे आयुष्य जगत होती. मात्र, नखांच्या आवडीमुळे तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. तिला गाडी चालवता येत नव्हती. डायना सलूनमध्येही जाऊ शकत नव्हती.

डायनाने तिच्या छंदाबद्दल सांगितले की, ती लहान असतानाही लांब नखे ठेवायची. डायनाच्या म्हणण्यानुसार, माझ्या मुलांनाही हे माहीत नव्हते की मी नखे का वाढवत आहे. याबाबत मी कोणालाही काही सांगितले नाही. ही गोष्ट फक्त माझ्यापुरती मर्यादित होती, पण एके दिवशी मी त्यामागचे कारण सांगितले.