चुकूनही शेअर करू नका तुमचं खासगी चॅट, अन्यथा होऊ शकते अशी शिक्षा

Personal Chat शेअर करताय? सावध व्हा, नाहीतर तुमच्यावरही ही वेळ येऊ शकते, वाचा नक्की काय झालंय? 

Updated: Oct 23, 2021, 10:46 PM IST
चुकूनही शेअर करू नका तुमचं खासगी चॅट, अन्यथा होऊ शकते अशी शिक्षा

दुबई: गेल्या काही वर्षात तरुणाई सोशल मीडियाकडे जास्त वळली आहे. प्रत्येक गोष्ट भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात मग्न आहे. नात्यातील दुरावा वाढत आहे आणि सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ सुरू आहे. सोशल मीडियावर खासगी चॅट शेअर करणाऱ्या पत्नीला चांगलाच याचा दणका बसला आहे. 40 वर्षीय महिलेला कोर्टाने चांगलीच शिक्षा दिली आहे. ही शिक्षा महिला आयुष्यभर विसरणार नाही. 

सोशल मीडियावर आपण काय आणि किती शेअर करतो याचं काही वेळा भान राहात नाही. या महिलेनं आपल्या पतीचा फोटो आणि फोन नंबर इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. तिथे पत्नीला तिच्या चुकीसाठी दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने त्यासाठी मोठा दंडही लावला. हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचलं तेव्हा आणखी धक्कादायक माहिती समोर आली. 

पोलिसांची चौकशीत माहिती मिळाली की, पतीसोबत या महिलेचं शेवटचं बोलणं जानेवारी झालं होतं. या चॅटचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. पीडित पतीने याची तक्रार दुबईतील पोलीस ठाण्यात केली. त्यामुळे 40 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा नोंदवल्याने ही केस कोर्टात गेली. 

पत्नीने प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप पतीने केला. महिलेनं तिच्या पतीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. महिलेला याची कल्पनाही नव्हती की एवढ्याशा गोष्टीसाठी आपला पती कोर्टात जाईल. या महिलेला कोर्टाने 41 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.