वॉशिंगटन : आपल्या जगात नेहमीच काहा ना काही विचित्र घटना घडत असतात. ज्यावर कधी कधी आपल्याला विश्वास ठेवणे देखील कठीण होते. अमेरिकेत एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यात जर ही अशी घटना भारतात होऊ लागली तर, आपल्यापैकी प्रत्येकाला पोलिंसांकडे यासाठी फाईन भरावा लागेल. कारण ही इतकी शुल्क गोष्ट आहे की, ज्यामुळे फाईन लावला गेला जाऊ शकतो असा आपण कधी विचारच केला नसावा.
आमेरिकेतील डायमंड रॉबिन्सन नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. डायमंड रॉबिन्सन ही कुशिंग स्ट्रीटवरील ईस्टपॉईंट इथे रहाते आणि तिने फोनवर जोर जोरात बोलल्यामुळे पोलिसांनी तिला 385 डॉलर (सुमारे 27 हजार रुपये) दंड ठोठावला आहे.
ही महिला तिच्या घरी फोनवर जोरजोरात बोलत होती. फोनवर बोलताना ती, कधीवर जात होती, तर कधी खाली येत होती. या दरम्यान तिच्या शेजारच्या एका महिलेने तिला तिचा फोन ठेवण्यासाठी आणि असे वर खाली जाणे थांबवण्यासाठी सांगितले. परंतु रॉबिन्सन काही ऐकली नाही. त्यानंतर त्या महिलेने तिला हळू बोलण्यासाठी सांगितले. तेव्हा रॉबिन्सनने त्या महिलेला माझ्या नजरे समोरुन निघून जा असे म्हणाली.
या घटनेनंतर थोड्याच वेळात पोलिस रॉबिन्सन च्या घरी आले. रॉबिन्सनने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले की, "यात माझी काही चूक नाही, तरही तुम्ही मला त्रास देणार असाल तर मी फेसबुक लाइव्हवरही हे सर्व संवाद शेअर करेन, जेणेकरून लोकांना सत्य समजू शकेल." आणि तिने लाइव्ह सुरु केले. परंतु तरीही पोलिसांनी तिच्या हातात 385 डॉलर दंडाची पावती ठेवली. या लाइव्हमध्येच ती म्हणते की, तिला फोनवर बोलण्यासाठी ही पावती मिळाली आहे आणि ही पावती पोलिसांनी फाडली कारण त्यांचे असे म्हणणे आहे की, मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्रास दिला आहे.
रॉबिन्सन पुढे म्हणाली की, ती तिच्याच घरात बोलत होती यात आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायचे कारण नाही. नंतर रॉबिन्सनने सांगितले की, ती रंगाने काळी असल्याने तिला टार्गेट केले गेले आहे. ज्या महिलेने पोलिसांना फोन करून बोलावले होते, ती महिला काही आठवड्यांपूर्वी तिच्या शेजारी रहायला आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर रॉबिन्सनने त्या महिलेला विचारले की, तुला माझ्यामुळे नक्की काय त्रास होतोय? परंतु त्या महिलेना काहीही उत्तर दिले नाही. परंतु या सगळ्या प्रकारानंतर या महिलेचा लाईव्ह खूप व्हायरल झाला आणि अमेरिकेत सर्वत्र लोकं याबद्दल चर्चा करु लागले.