घटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली!

महिला पतीला इतकी कंटाळली? म्हणते, 'माझं घर खरेदी करा आणि माझ्या पतीला पण ठेऊन घ्या...'  

Updated: May 26, 2022, 12:55 PM IST
घटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली! title=

मुंबई : प्रत्येक जोडप्यामध्ये भांडणं होत असतात. पण एका महिलेने तर घर कमी किंमतीत विकून पहिल्या पतीला त्या घरातचं राहू देण्याची अट घातली आहे.  एका महिलेने घर विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती म्हणते, जर खरेदीदाराने तिच्या पहिल्या पतीला घरात राहण्याची परवानगी दिली तर, घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला किंमतीत सवलत मिळेल, तसेच महिलेचा पहिला पती अनेक कामांमध्ये घरात मदत करेल.

एका महिलेने तिचा तीन बेडरूम, 2 बाथरूम, एक पूल आणि हॉट टब असलेले घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. महिलेने सांगितले की, जर कोणी हे घर विकत घेतले तर तिचा पहिला पती घरातील काम करण्यास मदत करेल. 

फेसबुकवर या घरासाठी जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार घराची किंमत 5 कोटी 34 लाखांपेक्षा जास्त आहे. पण महिलेने सांगितले, जर कोणी तिच्या पहिल्या पतीला घरात भाडेकरू म्हणून ठेवेल, तर घराची किंमत कमी होऊ शकते. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या बातमीनुसार, महिलेने हेही स्पष्ट केले आहे की, ती या घराची मालकीण नसणार आहे.

फ्लोरिडामध्ये महिलेचं घर 
क्रिस्टल बॉल असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे वय 43 वर्षे आहे. क्रिस्टल बॉलचं घर फ्लोरिडाच्या पनामा सिटी बीचजवळ आहे. हे आलिशान घर विकण्याचा निर्णय महिलेने घेतला आहे. ज्यामध्ये महिलेचा पहिला पती रिचर्ड चालू सर्व आवश्यक काम करणार आहे.

महिलेने का घेतला असा निर्णय
या महिलेने सांगितले की, 'तिला मार्केटिंगच्या नवीन पद्धती खूप आवडतात. माझ्या मते घटस्फोट घोषित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. क्रिस्टन म्हणाली की माझं नाव देखील मी बदललं आहे, तिने स्वतःचे ब्रोकरेज देखील सुरू केले आहे.

दोघांमधील 7 वर्षे जुने नाते नुकतेच संपुष्टात आले आहे. पण, दोघेही मुलांची जबाबदारी एकत्र पार पाडतील. एवढंच नाही, तर दोघे अनेक व्यवसायात देखील पार्टनर असतील.