कार चालवताना महिलेने असं काही पाहिलं की...

बियांका मेर्रिक या तरुणीसोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 1, 2017, 05:33 PM IST
कार चालवताना महिलेने असं काही पाहिलं की... title=
Representative Image

सिडनी : कार चालवत असताना तुम्हाला असं काही दिसलं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तर काय होईल? ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या बियांका मेर्रिक या तरुणीसोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

जोरदार किंचाळली

मेर्रिक नेहमीप्रमाणे आपली कार चालवत होती. मात्र, त्या दिवशी तिने कारमध्ये असं काही पाहीलं की ज्यानंतर ती जोरदार किंचाळली.

प्रचंड घाबरली 

झालं असं की, २४ वर्षांची मेर्रिक आपली कार घेऊन निघाली होती. त्याच दरम्यान तिची नजर गाडीत असलेल्या कोळी या किटकवर्गीय प्राण्यावर पडली आणि त्यानंतर ती प्रचंड घाबरली.

२० मिनिटे चालवली गाडी

गाडीत असलेल्या कोळीला पाहून मेर्रिक प्रचंड गोंधळून आणि घाबरून गेली. नेमकं काय करावं हे तिला कळत नव्हतं. तिने २० मिनिटे गाडी चालवली आणि आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचली.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेनंतर घाबरलेल्या बियांकाने ही गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही तिच्या कारमध्ये कोळी शिरला होता. तिने कार चालवत असताना त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.