Woman Posts TikTok Video : आज सोशल मीडियामुळे (Social media) लोकांचं आयुष्य हे पसर्नल राहिलेला नाही. उटसुट प्रत्येक गोष्टी लोक सोशल मीडियावर शेअर करतात. सोशल मीडियामुळे लोकं वेडे झाले आहेत असंच काही वेळा जाणवतं. या सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध होण्यासाठी लाईक्स् (likes) वाढविण्यासाठी लोक खूप खालच्या थराला जातं आहेत. अनेक वेळा धोकादायक स्टंट (Dangerous stunts) करुन जीव गमावल्याचा घटनाही आहेत. सध्या सोशल मीडियावर एक महिलेचा व्हिडीओ (Woman Video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
पहिल्या मुलाच्या जन्मानंतर तीन दिवसांत पती गमावलेल्या महिलेने पतीच्या हत्येची कहाणी (story of husband's murder) सोशल मीडियावर सांगितली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना महिलने डान्स करत सांगितल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येतं आहे. 2014 मध्ये गोळी लागून तिच्या पतीची हत्या झाली होती.
या व्हिडीओमध्ये ती सांगते की, ''8 वर्षांपूर्वी एका माणसाच्या चुकीमुळे अचानक माझ्या नवऱ्याला गोळी लागते आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. घटनेच्या 11 महिन्यांनंतर आरोपी मनुष्यवधाचा दोषी ठरला.त्या मारेकरला मी आमची प्रेमकथा सांगितली. एवढंच नाही तर मी त्याला असंही सांगितलं की त्याला कधी स्वतःबद्दल वाईट वाटू लागलं तर माझा चेहरा आठव.'' धक्कादायक म्हणजे हे सगळं ती डान्स करत सांगत होती. (Woman video dance husband murder Singing Widow jessica ayers Troll and video viral on Social media)
TikTok डान्स व्हिडिओ देखील ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र या महिलेवर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. 39 वर्षीय जेसिका आयर्स (Jessica Ayers) असं या विधवेचं नाव असून ती Panama City मध्ये राहते. शिवाय Singing Widow on TikTok या नावाने ती ओळखली जाते.
my husband was brutally murdered pic.twitter.com/Gj6tbEui2d
— yasmin (@ycsm1n) November 22, 2022
जेसिकाने तिच्या TikTok आणि वैयक्तिक ब्लॉग The Singing Widow या दोन्हीवर विधवा आणि single mom बद्दल आपले हृदयस्पर्शी अनुभव शेअर केले आहेत. पण तिचा हा व्हिडीओ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जेसिका सोशल मीडियावर ट्रोल (Troll) होतं आहे.