श्रीमंतांच्या यादीमध्ये ही महिला मुकेश अंबानींच्या पुढेच !

भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत असण्याचा मान रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींकडे आहे.

Updated: Oct 30, 2017, 08:21 AM IST
श्रीमंतांच्या यादीमध्ये ही महिला मुकेश अंबानींच्या पुढेच !  title=

मुंबई : भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत असण्याचा मान रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींकडे आहे.

गेल्या दहा वर्षांपासून ते अव्वलस्थानी आहेत. मात्र जगभरातील श्रीमंतांच्या यादीचा विचार करता सगळ्यात श्रीमंत महिला एलिस वॉल्टन मात्र मुकेश अंबांनीच्या पुढे आहे. 

जगभरातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीमध्ये एलिस मुकेश अंबानींच्या पुढे आहे. मुकेश अंबांनींकडे सध्या ३८ अरब डॉलर म्हणजेच २.६३ लाख करोड रूपये आहेत. मागील 5 महिन्यात त्यांची संपत्ती ४५ हजार करोडोंनी वाढली आहे. 

कोण आहे एलिस वॉल्टन ? 
एलिस वॉल्टन ही वॉलामार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची मुलगी आहे. जगातील सर्वात मोठी समजली जाणारी  रिटेल कंपनी 'वॉलमार्ट' ची स्थापना १९६७ साली करण्यात आली. १९९२ साली त्यांच्या मृत्यूनंतर संपत्तीचे तीन वाटे झाले. त्यानंतर एलिस वॉल्टन अअणि तिचे दोन भाऊदेखील जगातील टॉप २० श्रीमंतांच्या यादींमध्ये आहे. 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, वर्षभरात एलिसची संपत्ती ५३ हजार करोडहून २.६९ लाख करोड झाली आहे. 

एलिस आणि मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये सध्या ६ हजार करोड रूपयांंचा फरक आहे.