जगातील सर्वात मोठा कॅमेरा, 25 किमीपर्यंतचे अंतर फोटोमध्ये कैद करणार!

याला म्हणतात कॅमेरा! तब्बल 25 किमीचा फोटो न फाटता क्वालिटीमध्ये टिपता येणार     

पोपट पिटेकर | Updated: Oct 17, 2022, 11:25 PM IST
जगातील सर्वात मोठा कॅमेरा, 25 किमीपर्यंतचे अंतर फोटोमध्ये कैद करणार! title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : फोटोग्राफी (Photography) हे सध्याच्या काळात एक प्रत्येकाचा आवडीचा विषय बनलेला आहे. प्रत्येकाला वाटत की आपला फोटो हा छान यावा त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये (Mobile) चांगल्यातला चांगला मोबाईलमधील कॅमेरा (Mobile camera) घेण्यासाठी धडपड असते. यात अनेक फोनमध्ये 108 मेगापिक्सेलचे कॅमेरे (Megapixel cameras) आहेत. मात्र या सर्व फोनच्या पलीकडेही, Xiaomi 12T Pro नावाचा आणखी एक फोनमध्ये  तब्बल 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध आहे. परंतु आता जगातील सर्वात मोठा कॅमेरा (The world's largest camera) मार्केटमध्ये आलाय. जो तुमच्या विचारांच्या पलिकडेही अत्यंत मोठा आहे. पाहूयात किती मेगापिक्सल हा कॅमेरा (Megapixel cameras) आहे आणि काय आहेत त्याची वैशिष्टे.

जगातील मोठा डिजिटल कॅमेरा
जगातील सर्वात मोठा कॅमेराचं लॉंच (Camera launch) करण्यात आलाय. हा तब्बल 3 हजार 200 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा कॅमेरा कारपेक्षा उंच (Camera higher than car) आहे. त्यात 266 iPhones इतके पिक्सेल आहेत. हा कॅमेरा कॅलिफोर्नियातील SLAC नॅशनल एक्सीलरेटर प्रयोगशाळेत ठेवण्यात आला आहे. हा कॅमेरा इतका शक्तिशाली आहे की तो 25 किमीमीटर लांबची कोणतीही वस्तू टिपू शकतो. हा कॅमेरा चिली येथील रुबिन वेधशाळेत (Rubin Observatory in Chile) बसवण्यात येणार आहे. 

कॅमेरा कसे काम करेल
हा कॅमेरा लहान एसयूव्हीचा (Camera of a small suv) आकाराचा आहे. आणि तिचे वजन 2 हजार 800 किलो आहे. या लेन्समधील प्रतिबिंब विद्युत सिग्नलमध्ये रूपांतरित करते आणि स्पष्ट प्रतिमा तयार करते. यासाठी त्यातील 189 सीसीडी सेन्सर (CCD sensor) मदत करतात. ज्याच्या मदतीने जागेची छायाचित्रे टिपली जातील. उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूंपेक्षा 100 दशलक्ष पट छोट्या वस्तू शोधण्यासाठी दुर्बिणीची रचना (Structure of the telescope) करण्यात आली आहे. ते तुम्हाला हजारो मैल दूरवरून एक मेणबत्ती देखील दिसू शकते.

कॅमेराचा फायदा किती 
कॅमेराच्या माध्यमातून जगातील अनेक रहस्ये (Many secrets of the world) यात टिपली जाणार आहेत. तसेच गडद ऊर्जा आणि गडद पदार्थाच्या स्वरूपासह विश्वातील काही सर्वात मोठ्या रहस्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी याचा चांगला वापर होणार आहे. या कॅमेरातून ब्रह्मांडातील विविध रहस्य उलगडणार असल्याने सर्वांना याची उत्सकता आहे.

अंतराळ मोहिमेसाठी कॅमेराचा वापर
जगातील या मोठ्या कॅमेराच वापर अंतराळ मोहिमेसाठी (Space missions) केला जाणार आहे. 3 हजार 200 मेगापिक्सेल लेन्सच्या सहाय्याने आकाशातील रात्रीची फोटो (Night photo) यात टिपले जाणार आहे. आकाशात दिसणारे बदल रात्रीच्या वेळीही यात टिपणार आहे. याशिवाय तारे आणि आकाशगंगांची संख्या (Number of stars and galaxies) सांगण्याचेही काम हा कॅमेरा  करणार आहे. या कॅमेऱ्याने घेतलेले फोटो 378 4K अल्ट्रा हाय डेफिनिशन (Ultra High Definition) असणार आहे.