लॉस अँजेलिस : अमेरिकेतल्या लॉस अँजेलिसमध्ये एक पिझ्झा तयार करण्यात आला आहे. तब्बल दोन किलोमीटर लांबीचा हा पिझ्झा आहे. त्याची लांबी 6,333 फूट इतकी आहे. हा पिझ्झा जगातला सगळ्यात लांब पिझ्झा ठरला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली आहे. याआधी सगळ्यात लांब पिझ्झा इटलीमध्ये तयार करण्यात आला होता. 6 हजार 82 फुटांचा हा पिझ्झा होता.
डझनभर शेफनी एकत्र येऊन हा पिझ्झा तयार केला आहे. त्याचं वजन तब्बल 7 हजार 808 किलो इतकं आहे. त्यासाठी 2 हजार 632 किलो इतका मैदा, 1 हजार 634 किलो चीज, आणि 2 हजार 542 किलो सालसा सॉस लागला आहे. तसंच तीन इंडस्ट्रीयल ओव्हन सलग आठ तास हा पिझ्झा तयार करत होते.