worlds most expensive coffee: कॉफी पिणारे आणि चहा पिणारे अशा दोन प्रकारचे लोक असतात असं म्हटलं जातं. कॉफी पिणाऱ्यांची कॉफीसंदर्भातील आवडनिवड फारच स्पेसिफिक असतो. अनेकदा कॉफी पिणारे लोक एखाद्या विशिष्ट रेस्तरॉ किंवा हॉटेलमध्ये जाऊनच कॉफी पिण्याचा आनंद घेतात. मग यासाठी कितीही खर्च झाला तरी कॉफी प्रेमींना (coffee lover) फारसा फडक करत नाही. मात्र असं असलं तरी प्रत्येक गोष्टीची एक किंमत डोक्यात निश्चित असते. त्याहून अधिक दराला ती उपलब्ध असेल तर ती गोष्ट महाग वाटते. असाच काहीसा प्रकार एका जोडप्याबरोबर झाला. या दोघांनी एवढी महागडी कॉफी प्यायली की बील पाहून त्यांना धक्काच बसला. मासिक बाजाराचा विचार केला तर वर्षभर पुरेल एवढा किराणा भरता येईल इतक्या किंमतीची ही कॉफी होती.
या जोडप्याने जगप्रसिद्ध स्टारबक्स (starbucks) या कॉफी रेस्तराँमध्ये दोन कप कॉफीसाठी तब्बल 3.50 लाख रुपये मोजले. या दोघांनी या कॉफीचं पेमेंट क्रेडिट कार्डने केलं. पैसे भरले तेव्हा त्यांना या बिलाच्या रक्कमेबद्दल कल्पना आली नाही. मात्र जेव्हा ते पुढील शॉपिंगसाठी गेले तेव्हा कार्डवर बॅलेन्स ओव्हर लिमिट दाखवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी स्टेटमेंट चेक केलं असता त्यांना धक्काच बसला. 700 ते 800 रुपयांच्या कॉफीसाठी त्यांनी तब्बल 3 लाख 67 हजार रुपये भरले.
अमेरिकेतील हे जोडपं कायम कॉफी पिण्यासाठी स्टारबक्समध्ये जायचं. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या आवडीच्या फ्लेवरची कॉफी मागवतील. यानंतर त्यांनी क्रेडिट कार्डने पेमेंट केलं आणि बिल न चेक करताच ते निघून गेले. हे दोघे शॉपिंग करण्यासाठी बाजारात गेले तेव्हा बिल भरताना कार्ड ओव्हर लिमिट दाखवण्यात आलं. त्या कार्डवरुन त्यांनी मागील दोन दिवसांमध्ये केवळ कॉफीचं बिल भरलं होतं. मात्र हे बिल तब्बल 3 लाख 67 हजार रुपये इतकं होतं. त्यामुळे त्याचं क्रेडिट लिमीट एका दिवसात संपलं.
अमेरिकन जोडप्याचं नाव जेसी आणि ओडेल असं आहे. आपल्या आवडत्या कॉफी ब्रॅण्डच्या माध्यमातून असं काही घडेल असा विचारही या दोघांनी केला नव्हता. यासंदर्भात या दोघांनी लगेच स्टारबक्सच्या प्रशासनाला कळवलं. कॉफीचा एवढा दर का लावण्यात आला याबद्दल त्यांनी विचारलं. त्यावर त्यांना ह्यूमन एरर असं कारण देण्यात आलं. कंपनीने या दोघांच्या तक्रारीनंतर कॉफीची रक्कम वजा करुन उरलेल्या रक्कमेचा चेक परत केला. मात्र जेसी आणि ओडेल यांनी हा चेक बाऊन्स झाल्याची तक्रार केली आहे. स्टारबक्सकडून मिळाली ही वागणूक चुकीची आणि निराश करणारी असल्याचं सांगितलं. आम्हाला स्टारबक्सने जगातील सर्वात महागडी कॉफी विकली असून आम्ही तिचा आनंद घेतला. एवढी महाग कॉफी यापूर्वी कोणीच प्यायली नसेल असा टोलाही या दोघांनी लगावला. सध्या हे दोघेही कंपनीकडून पैसे परत मिळण्याची वाट पाहत आहेत.