राणीसोबत आपल्या मुलाला पाहून 'हा' बॉलिवूड स्टार म्हणतो....

सोशल मीडियावर अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. राणीचा हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण, म्हणजे त्याच फोटोतून तिच्यासोबत झळकणारा एक मुलगा.

Updated: Jun 4, 2019, 04:50 PM IST
राणीसोबत आपल्या मुलाला पाहून 'हा' बॉलिवूड स्टार म्हणतो....

मुंबई : काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. राणीचा हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण, म्हणजे त्याच फोटोतून तिच्यासोबत झळकणारा एक मुलगा. खुद्द आमिर खाननेही या मुलासोबता राणीचा फोटो पाहत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता आमिरच प्रतिक्रिया देतोय म्हटल्यावर तो मुलगा आहे तरी कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 

परफेक्शनिस्ट आमिर खानने शेअर केलेल्या या फोटोत दुसरं- तिसरं कोणी नसून, त्याचाच मुलगा जुनैद दिसत आहे. राणीचं मन जिंकण्यात जुनैद यशस्वी झाला हे पाहून मी स्वत:च थक्क आहे, असं तो म्हणाला. जे आपल्याला जमलं नाही ते जुनैदने करुन दाखवलं, असं त्याने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं. सेलिब्रिटींच्या मुलांविषयी अनेक चर्चा बी- टाऊनमध्ये रंगतात. पण, आमिरच्या पहिल्या पत्नीपासून झालेला हा त्याचा मुलगा मात्र या चर्चांपासून काहीसा दूर असतो. पण, तरीही स्टार किड्सच्या यादीत त्याच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. 

आमिरने पोस्ट केलेल्या या फोटोमुळे त्याची आणि राणी मुखर्जीची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच अनेकांना आठवत आहे. या दोन्ही कलाकारांनी ‘गुलाम’, ‘तलाश’, 'मंगल पांडे- द राजजिंग’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.  रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या काही सेलिब्रिटी जोड्यांमध्ये राणी आणि आमिरच्या जोडीचाही समावेश होतो.