दयाशंकर मिश्र : बाजारात काय नवीन आहे, वृत्तपत्र, वेबसाईटमध्ये तर बातम्यांची गर्दी आहे. हे खरेदी केलं, तर ते मोफत मिळेल. जगातील इतर देशांच्या तुलनेत, भारतात मोफत मिळण्याविषयी लोकांचं आकर्षण जास्त आहे. एक इच्छा पूर्ण करण्याआधीच, आपली उडी दुसऱ्या इच्छेवर असते. यातून मनाचं पलायन, मन कुठेच न स्थिरावणं. कुठेच मन लागत नाही, असंही म्हटलं जातं. वृत्तपत्रातही आता असे कॉलम यायला लागले आहेत, त्यात तज्ज्ञ सांगतात, की काय खरेदी केलं पाहिजे, काय नाही. कर्ज किती घेतलं पाहिजे, किती नको. सल्ला घेण्यात वाईट काहीच नाही, पण आपल्याला माहिती व्हायला हवं, जीवनात कोणत्या गोष्टीला किती स्वीकारायला हवं, महत्व द्यायला हवं.
समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने सर्वात जास्त जोर खरेदी करण्यावर आहे. या खरेदीच्या इच्छेत अनके पट जास्त वाईट आहे, ते म्हणजे आकर्षण आणि तुलना करणं. आम्ही दुसऱ्यांसोबत तुलना करण्यात असतो. तो असं करतो, आम्ही केव्हा असं करू, आम्ही त्याच्या सारखं जीवन कधी जगू शकू, आम्हाला कधी त्याच्यासारखं जीवन मिळेल.
तुलनेचं तत्व आमच्या अंतर्मनात खोलपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. माझ्या ओळखीतील, दोन व्यक्तींबद्दलच मी विश्वासाने सांगू शकतो की, मी यांना कधी तुलनेच्या जंगलात रस्ता विसरताना पाहिलं नाही.
आम्ही नको त्या गरजेमध्ये गोंधळून गेलो आहोत. गरजांमध्ये अडकलेला समाज, गोंधळलेला समाज. आमचं चिंतन गरज आणि खरेदीच्या पुढे नाही जात. आम्हाला समजतंच नाहीय की, याच्याशिवाय आपल्याकडे काही कामं अजून बाकी आहेत. आपण कधी खरेदीत गोंधळलेलो आहोत, तर कधी विकण्यात. नाही तर आपण या खरेदी विक्री योजनेत व्यस्त आहोत. माझी विनंती एवढीच आहे, आपण वस्तुंपेक्षा जास्त महत्व अनुभवाला दिलं पाहिजे. आपल्याला बिनागरजेच्या वस्तुंमध्ये अडकण्याची गरज नाही, या जागी शिकणे, समजणे, आणि फिरण्याची गरज आहे.
उदाहरण म्हणून समजा की, युरोप, अमेरिका आणि तेथील आरामाचं जीवन, उपभोगी संस्कृती याचं भारतीय नेहमी उदाहरण देतात. भौतिकवादात गुंतलेले आहेत. हा समज यामुळे देखील तयार झाला आहे की, तेथे जास्तच जास्त शोध लागतात. हे स्पष्ट आहे की, ते पहिले उपयोगकर्ते आहेत. वस्तुंची खरेदी करणे आणि वापरणे यात ते सर्वात आघाडीवर आहेत. पण या सोबत आपण विसरून जातो की, युरोप, अमेरिका, ब्रिटन हे भारतीयांच्या तुलनेत अधिक यात्रा करणारे देश आहेत. या देशातील नागरीक फक्त भारतीयच नाही, तर आशियातील नागरिकांपेक्षा किती तरी पट जास्त यात्रा करतात आणि पैसा खर्च करतात. येथे कॉलेज आणि करिअर झालेले लोक सुद्धा मनसोक्त यात्रा करतात. यात्रे दरम्यान ते सामान्य वस्तू खरेदी करतात, त्यांच्यावर भागवतात. अडचणींचा सामना करून ते यात्रा करतात. पुस्तकं खरेदी करताना आणि वाचताना ते तुम्हाला दिसतील.
दुसरीकडे आम्ही भारतीय, यात्रा करणे, वाचणे, पुस्तकं विकत घेणे, सिनेमा, नाटक पाहणे या गोष्टींपासून दूर पळतो. आम्ही पैशांचा उपयोग करण्यापेक्षा, त्यांना आपला स्वामी बनवून घेतलं आहे. आम्ही त्याला सूट देतोय की, पैसा त्याच्या हिशेबानुसार आपल्याला वापरेल, हे उल्टी गंगा वाहण्यासारखं आहे. काय आपण आपल्या कॉम्प्युटरला एवढी सुट देतात की तो, आपल्या मर्जीने तो कमांड देईल आणि तुम्ही त्याला कमांड देता की, तो आपल्या इच्छेने चालेल.
पण आपल्या जीवनात परिस्थिती उलट आहे. जीवनाचा मूळ अर्थ यात्रा, नावीन्य, वाचणे, चिंतन आणि संवादापासून दूर पळणे असा झाला आहे. पण याच गोष्टीतून आपण अनुभवी व्यक्ती तयार होतो. आपल्या आतील अनुभवाने जग समृद्ध होतं. हेच अनुभव आपल्याला अंतर्गत निर्णय घेण्यात आणि निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवण्याचं काम करतात.