ज्यांना ''हाफकीन'' माहित झाला, त्यांना ''कोरोना''सारख्या आजाराची कधीच भीती वाटणार नाही

 भारतात जे मोठे साथीचे आजार आले, त्यापैकी २ आजारांवर हाफकीन यांनी लस शोधून काढली, हाफकीन यांनी त्यांच्या आयुष्यातील २२ वर्ष भारतात काढली. 

जयवंत पाटील | Updated: Jul 30, 2021, 11:05 PM IST
ज्यांना ''हाफकीन'' माहित झाला, त्यांना ''कोरोना''सारख्या आजाराची कधीच भीती वाटणार नाही

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : एखाद्याच्या स्वभावाला हाफकीन इन्स्टीट्यूटमध्येही लस सापडत नाही, असं आपण गंमतीत म्हणत असतो. पण  हाफकीन ही संस्था म्हणजे आहे तरी काय? हे नक्कीच समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल हाफकीन संस्थेला हाफकीन हे नाव युक्रेनमधील ओदेसो या देशातम जन्मलेल्या वाल्डेमर मोर्डेकई हाफ़किन यांच्या नावावरुन पडलं. भारतात जे मोठे साथीचे आजार आले, त्यापैकी २ आजारांवर हाफकीन यांनी लस शोधून काढली, हाफकीन यांनी त्यांच्या आयुष्यातील २२ वर्ष भारतात काढली. 

वाल्डमेर हाफकिन यांचं भारतात येणं हा निव्वळ एक योगायोग आहे, असं काहींना वाटतं, तर अनेकांना मते हाफकीन स्वभावात नव्याचा शोध घेण्याचा एक गुण होता, तो स्वभाव गुण हाफकीनला भारतात घेऊन आला.

आजार आला की लस शोधणे सुरु

बॅक्टीरिओलॉजीवरील त्यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवला. आपल्या गुरुजवळ जेव्हा हाफकिन पोहोचले तेथून त्यांच्या जीवनात एक वेगळं आणि प्रभावी वळणं आलं. येथूनच विविध साथींच्या आजारांवरील लसींचा शोधाचा प्रवास त्यांनी सुरु केला. 

हा माणूस लवकर समाधानी होणारा नव्हता

पास्चर इन्स्टीट्यूटमध्ये त्यांना तसं सहाय्यक लायब्रेरियनचं पद मिळालं, पण बॅक्टीरिओलॉजीवरील त्यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवला. लवकरच त्यांचा मूड बदलला, त्यांनी लस बनवण्याकडे आपलं लक्ष्य वळवलं. वाल्डमेर हाफकिन हा माणूस लवकर समाधानी होणारा नव्हता, हे त्यांच्या आधीच्या प्रवासातून समजलंच असेल.

ठराविक अंतराने लस देण्याचा फॉर्म्युला हाफकीनचाच

वाल़्डमेर हाफकिन य़ांनी क़ॉलरावर लस बनवण्याचं काम सुरु केलं. कॉलराची लस हाफकिन यांनी पहिल्यांदा कोंबड्याला दिली, नंतर गिनीपिगला देऊन त्याच्यावरील परिणामांचा अभ्यास केला, यानंतर स्वत:ला ही वॅक्सीन लावून घेतली. हाफकिन यांनी जी लस शोधली, ती कोरोनासारखीच ठराविक अंतराने म्हणजे ३० दिवसांनी, किंवा दीड महिन्यांनी दुसरा डोस अशी द्यावी लागत होती.

दोन लसींमधील अंतर त्या लसीचा शरीरात प्रभाव वाढवण्यास मदत करतो, हे देखील हाफकिन यांनीच शोधून काढलं आहे, असं म्हणतात. हाफकिन यांचं समाधान करणारी लस त्यांना सापडली आहे, कॉलराची साथ जेथे सुरु आहे, तेथे मोठ्या प्रमाणात ही वापरता येईल, असं हाफकिन यांना वाटलं. 

हाफकीनचा गुरु हाफकीनवर असमाधानी पण

कॉलरावरील या लसीविषयी त्यांनी त्यांचे गुरू लुई पास्चर यांना माहिती दिली. पण धक्कादायक गोष्ट अशी होती, त्यांचे गुरु लुई पास्चर हे हाफकिन यांच्या त्या कॉलरा लसीविषयी असमाधानी होते.

हाफकिन यांच्या कॉलरावरील लसीचा दावा चुकीचा ठरवण्यात आला, कारण कॉलरा हा आतड्यांचा आजार आहे, तो पोटाच्या आतड्यांशी संबंधित आहे, त्यासाठी लसीचा उपयोग होवू शकत नाही, असं कारण त्यांना देण्यात आलं.

आजार जिथे तिथे लस घेऊन तिथे पोहोचले....

अखेर भारत गाठला

यानंतर योगायोगाने हाफकिन यांची ओळख लॉर्ड फ्रेडरिक हेमिल्टन डफ़रिन यांच्याशी झाली, ते त्यावेळी पॅरीसमध्ये ब्रिटनचे राजदूत होते आणि याआधी भारतात व्हॉईसरायपदी होते. भारतात कॉलराने हाहाकार माजवला होता. 

आजार नाही हा तर देवाचा प्रकोप?

लॉर्ड फ्रेडरिक हेमिल्टन डफ़रिन यांना वाटलं ही लस भारतात वापरली गेली पाहिजे, त्यांनी हाफकीन यांना त्यांच्या प्रयत्नाने भारतात पोहोचवलं. 

मार्च १९८३ रोजी जेव्हा हाफकीन हे कोलकात्याला पोहोचले, तेव्हा त्यांना विरोध होत होता. त्याकाळी लसीने साथ थांबेल, यावर बहुतांश भारतीयांचा विश्वास नव्हता. हा देवाचा प्रकोप आहे, असा गैरसमज देखील होता. 

हाफकीन यांनी पॅरिसमध्ये ज्या विषाणूवर जे प्रयोग केले होते, तो विषाणू आणि भारतातील विषाणू यात फरक आहे, यामुळे हाफकीनच्या लसीचा फायदा येथे काही होणार नाही असं म्हटलं जात होतं. ही माहिती जर्नल ऑफ मेडिकल बायोग्राफीने दिली आहे. 

तर लस घेणे त्यांच्यासाठी दूर

भारतात सर्व सामान्य माणसाला वाटत होतं हा देवाचा प्रकोप आहे, यासाठी साधं डॉक्टराचं औषध घेऊ नये असा समज होता, तर लस घेणे त्यांच्यासाठी दूर होतं. हाफकीन जेव्हा पश्चिम बंगालमध्ये पोहोचले तेव्हा कॉलराच्या साथीचा प्रभाव कमी झाला होता. पण पंजाब आणि अवधमध्ये मात्र कॉलरा होता.

कोलकात्यात पुन्हा कॉलराने डोकं वर काढलं

कॉलराचा सर्वात जास्त फटका लष्कराला बसत होता, लष्करानेच हाफकीन यांना संपर्क केला. सर्वात आधी ते आग्र्याला आले आणि त्यानंतर उत्तर भारतातील सैनिक छावण्यांमध्ये ते फिरले आणि १० हजाराच्या वर सैनिकांना त्यांनी इंजेक्शन्स लावले. हाफकीनची ही लस यशस्वी ठरली आणि देशात हाफकीनची मागणी वाढू लागली. कोलकात्यात पुन्हा कॉलराने डोकं वर काढलं तेव्हा त्यांना पुन्हा परत बोलावण्यात आलं. 

कमी काळात ४० हजारपेक्षा जास्त लोकांनी लस

हाफकीन आसामच्या चहाच्या मळ्यातही लस द्यायला गेले, पूर्वीच्या काळी ही लस खूप हात दुखवायची तरीही दैवी प्रकोप आहे, असा समज असणाऱ्या काळात ही लस अनेकांना दिली गेली. हाफकीन यांनी कमी काळात ४० हजारपेक्षा जास्त लोकांनी लस दिली. 

पण हे लसीकरण नव्हतं, तर हा एक प्रयोग होता, परीक्षण होतं आणि त्यावेळी आणि आताही हे जगातील सर्वात मोठं परीक्षण आहे, असं म्हटलं तर काहीच चुकीचं नाही.

प्लेगवर वॅक्सीन बनवण्याचं काम देण्यात आलं

भारत कुठे तरी कॉलरातून बाहेर येत होता, यानंतर व्यूबोनिक प्लेग भारतात पसरला. प्लेगचा कहर हा कॉलरापेक्षा जास्त होता, त्यामुळे ५० टक्के लोकांना त्याने संक्रमित करण्याचा धोका होता. यावेळेस हाफकीन यांचा मानसन्मान वाढला होता, त्यांना प्लेगवर वॅक्सीन बनवण्याचं काम देण्यात आलं.

मुंबईत फक्त ३ महिन्यात लस शोधली

मुंबईत जेथे ग्रँट मेडिकल कॉलेज आहे तिथे ही प्रयोगशाळा बनवण्यात आली. हाफकीन १८९६ मध्ये तेथे पोहोचले, त्यांनी त्या काळात फक्त ३ महिन्यात लस शोधली. एवढंच नाही ससा या प्राण्यावर पहिला यशस्वी प्रयोग देखील केला.

प्रयोग म्हणून त्यांनी पहिली लस स्व:ला टोचून घेतली

यावेळी देखील त्यांनी तोच प्रयोग केला,  मानवावर लसीचा पहिला प्रयोग म्हणून त्यांनी पहिली लस स्व:ला टोचून घेतली.पण त्यांचं महत्त्वाचं परीक्षण तेव्हा झालं, जेव्हा भायखळा जेलच्या कैद्यांना ही लस दिली गेली. विशेष म्हणजे त्या काळात कैद्यांवर लसीचं परीक्षण करणे हे काही वेगळं नव्हतं. प्लेगच्या लसीची ट्रायल करण्यासाठी जवळपास १५० कैदींना तयार करण्यात आलं. 

लस दिल्यानंतर ३ कैद्यांचा मृत्यू

पण येथे असा निर्णय घेण्यात आला की यांना आधी संक्रमित करु प्लेगच्या रोग्यांसोबत ठेवू आणि मग लस देऊ, तसंच झालं. यात पहिला धक्का बसला लस देण्याच्या पहिल्याच दिवशी लस दिल्यानंतर ३ कैद्यांचा मृत्यू झाला. 

लस मोठ्या प्रमाणात काम करतेय, असा शिक्कामोर्तब

पुढील आठवड्यात आणखी काही कैद्यांचा मृत्यू झाला. खरंतर ही फारच कडक ट्रायल होती कारण आधी प्लेग रुग्णांच्या संपर्कात आणून बाधित करणे आणि त्यानंतर लस देणे, त्यातही मोठ्या प्रमाणात कैदी वाचल्याचं दिसून आलं. म्हणजे लस मोठ्या प्रमाणात काम करतेय, असा शिक्कामोर्तब करण्यात आला.

मुंबईत एक हजार लोकांना प्लेगची लस

यानंतर मुंबईत ज्या भागात प्लेगचं संक्रमण अधिक झालं आहे, अशा भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं, एक हजार लोकांना प्लेगची लस देण्यात आली. नंतर लक्षात आलं की ही लस ५० टक्के लोकांचा जीव वाचवते, पण ५० टक्के लोकांचा जीव वाचवणं हे साथीच्या काळात यशस्वी मानलं जातं. हाफकीन यांनी पुढील काही वर्ष या लसीवर नवनवीन प्रयोग सुरु ठेवले, लस लोकांना देण्याचंही त्यासोबत सुरुच होतं.

लस शोधणाऱ्या हाफकिनला अनेक अडचणी

कॉलरा आणि प्लेग रोगावरील लस शोधणाऱ्या हाफकिनला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, त्याने लाखो लोकांना जीवदान दिलं असेल, पण एक चूक जरी त्याच्या नावावर गेली तरी त्यात स्वत:ची बाजू मांडणं त्याच्यासाठी कठीण होत होतं. 

इतिहासातील मुल्कोवाल डिझायस्टर

पंजाब राज्यातील एक गाव मुल्कोवालमध्ये अशी घटना घडली, ज्याला इतिहासातील मुल्कोवाल डिझायस्टर म्हणतात. मुल्कोवाल गावात ३० ऑक्टोबर १९०२ मध्ये  १०७ लोकांना वॅक्सीन देण्यात आली. काही दिवसांनी यातील १९ लोकांमध्ये टिटॅनस म्हणजे धनुर्वादाची लक्षणं दिसून आली. 

लवकरच या सर्वांचा मृत्यू देखील झाला. या घटनेचा आरोप हाफकीन यांच्यावर आला आणि त्यांना बडतर्फ करण्यात आलं. या घटनेचे पडसाद ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये देखील दिसून आले. 

हाफकीन यांची त्याच्यात कोणतीही चूक नव्हती

व्यथित झालेले हाफकिन्स पॅरिसला परतले आणि तिथून पत्र लिहून आपला बचाव करु लागले. या घटनेची चौकशी झाल्यानंतर समोर आलं की, हाफकीन यांची त्याच्यात कोणतीही चूक नव्हती, त्यांच्या सहाय्यकाने वॅक्सिनच्या बॉटलचं झाकण नीट साफ न केल्याने ही घटना घडल्याचा निष्कर्ष लावण्यात आला.

यावेळी जेव्हा हाफकीन भारतात परतले तेव्हा त्यांना कोलकात्यातील बॉयोलॉजिकल लॅब्रोटरीचं डायरेक्टर म्हणून पदभार देण्यात आला. या प्रयोगशाळेत वॅक्सीनचा शोध आणि उत्पादन करणे अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. मुल्कोवालमधील घटनेच्या आरोपांनी हाफकिन यांची साथ सोडलेली नव्हती असंच वाटत होतं.  

जैन धर्माच्या अहिंसावादी विचारांनी प्रभावित

असं म्हणतात की या दरम्यान ते जैन धर्माच्या अहिंसावादी विचारांनी प्रभावित झाले आणि त्यांनी चाचणीसाठी पशु-पक्षींचा वापर करणे बंद केलं. असं म्हणतात की एकदा त्यांनी आपल्या सहयोगीला यासाठी खूप झापलं कारण तो एका लांब (टेपवर्म) जंताचं डिसेक्शन करत होता. असं म्हणतात की या काळात ते जैन धर्माच्या अहिंसावादी प्रभावाने प्रभावित झाले, त्यांनी प्रयोगासाठी पशु-पक्षांचा वापर पूर्णपणे बंद केला.

तीन वर्षानंतर भारतीयांना हाफकीन पुन्हा आठवला

याच दरम्यान १९१५ मध्ये हाफकीन जेव्हा ५५ वर्षाचे झाले त्यांना निवृत्त करण्यात आलं, यानंतर ते युरोपला परतले.  तीन वर्षानंतर भारतीयांना हाफकीन पुन्हा आठवला , जेव्हा स्पॅनिश फ्लू महामारी ठरला. पण यावेळी हाफकीन उपलब्ध नव्हते, विज्ञानापासून दूर ते आपलं ज्यू धार्मिक चौकटीनुसार जगण्याचा प्रयत्न करत होते. 

काही लोकांनी महात्मा हाफकिन देखील म्हटलं

ज्याच्याशी संबंधित त्यांनी एक लेख देखील लिहिला होता, प्ली फॉर आर्थोडॉक्सी, म्हणजेच कट्टरताचे तर्क. त्यांना मिळालेल्या यशावरुन त्यांना काही लोकांनी महात्मा हाफकिन देखील म्हटलं. याच नावाने त्यांच्यावर एक पुस्तक देखील प्रकाशित झालं. 

नाव बदलून हाफकीन इन्स्टीट्यूट

मुंबईत ग्रँट हॉस्पिटलचं नाव १९२५ मध्ये बदलून या प्रयोगशाळेचं नाव बदलून हाफकीन इन्स्टीट्यूट करण्यात आलं. १९६४ मध्ये भारतीय टपाल विभागाने त्यांच्यावर एक तिकीट देखील प्रकाशित केलं. हाफकीन यांची जगाला आणि त्यापेक्षाही जास्त भारताला आठवण झाली आहे, ती त्यांच्या भारतातील कार्यामुळे.