रवि पत्की, मुंबई : T20 World Cup 2022 अवघ्या एका महिन्यावर आलाय. भारताचा (Team India) पहिलाच सामना अंतिम सामना असल्यासारखा आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबरला पाकिस्तान (India vs Pakistan) विरुद्ध मेलबर्नला होणार आहे. सामना आधीच हाऊसफूल (House Full) झाला आहे. पण T20 ची लोकप्रियता अफाट असल्याने भारताचे सर्वच सामने अतिशय उत्कंठेने पाहिले जाणार आहेत. (t 20 world cup 2022 team india some players establishment are well settled this thing dangerous or a blessing for team progress read ravi patki blog)
टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 2013 ला Champions Trophy जिंकली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाला एकही ICC स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारतीय संघ 2015 ,2016,2019 या वेगवेगळ्या प्रकारच्या white ball world cups मध्ये संघ उपांत्य फेरीत पोचला होता.
क्रिकेटची आर्थिक महासत्ता असताना भारताचा जागतिक स्तरावरचा हा आलेख काही उल्लेखनीय नाही. द्विपक्षीय सामन्यात (bilateral series)भारताने ठीकठाक कामगिरी केली. पण ICC स्पर्धेत प्रगती खुंटली आहे. त्यामागे महत्वाचं कारण म्हणजे IPL मधील कामगिरी हे खेळाडूंच्या कामगिरीचे मोजमाप धरलं गेलं. IPL जरी तुफान यशस्वी स्पर्धा असली, तरी standard wise ती सर्वोच्च म्हणणे धाडसाचं होईल. प्रत्येक संघात 4 च परदेशी खेळाडू असणे, सर्व सामने भारतीय पीचेस आणि हवामानात होणे या गोष्टी खेळाडूंना जोखायला मर्यादा आणतात.
या वेळचा निवडलेला वर्ल्ड कप संघ बघितला तर लक्षात येईल की अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रस्थापित आहेत. तर सगळे IPL मध्ये प्रस्थापित आहेत. दिनेश कार्तिक भारताने खेळलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय T20 संघाचा (2006) भाग होता. म्हणजे त्याचे आंतरराष्ट्रीय T20 वय हे 16 वर्षे आहे.
अश्विन आणि कोहलीचे प्रत्येकी 12 वर्षे आहे. भुवनेश्वरचे 10 वर्षे आहे. इतर खेळाडूंचे 5 ते 7 वर्षे आहे.बऱ्याच खेळाडूंचे IPL चे वय 10 वर्षांहून अधिक आहे.म्हणजे हे सर्व खेळाडू प्रस्थापित आहेत.त्यांचे आयुष्य सेट आहे.
पुढील IPL हंगामातील त्यांची मोठमोठी कंत्राटं फिक्स आहेत. आता प्रश्न असा आहे की इतक्या सुरक्षित खेळाडूंचा ICC event खेळताना स्वसंवाद कसा असेल? जीव ओतून ही ट्रॉफी जिंकायचीच, इतिहासात नाव कोरायचंच, अनुभवाचा वापर करून हुशार क्रिकेट खेळायचे, कितीही तणाव येउद्या मॅचेस जिंकायच्याच, आयुष्य सेट आहे चिंता नाही. आता काही सिद्ध करायचे नाही, म्हणून खेळाचा आनंद लुटून ट्रॉफी जिंकूच असा स्वसंवाद असेल की स्वतः च्या मर्यादेत खेळावे, कशाला इतके झोकून द्यायचे,आपण तर सेट आहोत,सगळी सुखं पायाशी लोळण घेत आहेत ,कशाला आटापिटा करायचा अशी निश्चिंती मनात असेल?
रोहित अवघ्या काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत म्हणाला, "आम्ही गेल्या दहा वर्षात चांगला खेळ केला आहे. पण ICC ट्रॉफी जिंकायला जो extra factor लागतो तो आमच्यात कमी पडला आहे". आता हा extra factor म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि थोडं या स्पर्धेत जो special talent लागतो तो. या दोन्हीची वानवा जाणवलेली आहे.
अनुभवी आणि प्रस्थापित ह्यात थोडा फरक आहे. प्रस्थापित थोडा बेफिकीर असू शकतो. तो त्याच्यातला extra effort देइलच असं नाही. भारतीय खेळाडू प्रस्थापित आहेत म्हणून त्यांची खात्री देता येत नाही असे वाटते. तसेच अगदी शेवटपर्यंत संघाचे प्रयोग चालू असतात. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला तरी करेक्ट combination ची शेवटपर्यंत खात्री नसते असं वाटतं. 2019 मध्ये विजय शंकरसाठी केलेला हट्ट, दिनेश कार्तिकशी चाललेला खेळ ही त्याचीच उदाहरणे आहेत.
श्रीलंकेने 11 युवक खेळाडू प्रेरणा आणि प्रतिभा ह्याच्या संयुगाने काय करू शकतात. हे नुकतेच ASIA CUP मध्ये दाखवून दिले आहे. भारतीय संघाचे प्रस्थपित असणे शाप ठरणार की वरदान?