पोपट पिटेकर, झी २४ तास, मुंबई : भारतात नागरिकांच्या सुरक्षासाठी पोलिसांबरोबर अनेक एजन्सीज काम करतात. परंतु पोलिसांच्या अतुलनीय कामगिरीमुळे अनेकांना आपण सुरक्षित आहोत असं वाटतं. परंतु तरी सुद्धा काही लोकांना विशेष कारणासाठी बंदूकीची आवश्यकता भासते. त्यामुळे देशातील कोणताही नागरीक लायसन्स बनवू शकतो. बंदुकीचं लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही बंदुक विकत घेऊ शकता. बंदुकीच लायसन्स मिळवणे खूप अवघड नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला तब्बल २४ कागदपत्रे समाविष्ट करावी लागतील. त्याचबरोबर लायसन्स मिळवल्यानंतर ते फक्त आपल्या आत्मसंरक्षणासाठी त्याचा ते वापर करु शकतात. पण त्याचा वापर तुम्ही कोणाला धमकवण्यासाठी करू शकत नाही.
तुम्हाला वाटतं असेल की तुम्हालाही बंदुकीच लायसन्स पाहिजे तर, सरकारने दिलेल्या नियमानुसार प्रशासनाला कळवावे लागेल की, बंदुकीची गरज का आहे तुम्हाला?
बंदुकीच लायसन्स घेण्याचा अधिकार सर्वांचा आहे. परंतु तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल की त्याची तुम्हाला गरज का आहे. त्यांनतर प्रशासनवर अवलंबून असतं की, तुम्ही सांगितलेलं कारण योग्य आहे किंवा नाही. म्हणजे बंदुकीची गरज नक्की आहे का?
प्रशासनला वाटलं की तुम्हाला बंदुकीची गरज आहे, तर तुम्ही लायसन्स बनवू शकता. लायसन्स बनवण्यासाठी कोणताही कालावधी नसतो. या कालावधीतच तुम्हाला लायसन्स मिळू शकेल.
बंदुकीच लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला एका अर्जाबरोबर सहमती पत्र जमा करावं लागेल. परंतु आता ही प्रक्रिया ॲानलाईन सुद्धा झाली आहे. ॲाफलाइन अर्ज देताना आपल्या क्षेत्रातील डीसीपी ( DCP) कार्यालयात अर्ज जमा करावा लागेल. इतर शहरात हा अर्ज एसडीएम ( SDM) यांना द्यावा लागेल. परंतु पोलिस आयुक्त यांचा भाग असेल तर पोलिस आयुक्त यांना अर्ज करावा लागेल.
डीएमनी ( DM) दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्यासाठी एसपी ( SP) यांच्या ॲाफिसमध्ये अर्ज पाठवला जातो. एसपींच्या ॲाफिसमधून त्या स्थानिक पोलिस स्टेशनकडे पाठवले जाते. स्थानिक पोलिस स्टेशन काही कालावधीनंतर लायसन्स अधिकारी यांच्याकडे पाठवले जाते. त्यांनतर तुम्ही केलेल्या अर्जाला मंजुरी दिली जाते. अनेकवेळा अर्ज रद्द देखील केलं जातं.
तुम्हाला कोणत्या बंदुकीच लायसन्स पाहिजे त्यावर किती पैसे लागतील, हे अवलंबून असतं. परंतु असं नाही की लाखो रूपये लागतील. बंदुकीचं लायसन्स काढण्यासाठी फक्त १० रूपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत खर्च आहे. तुम्हाला जर हैंडगन ( पिस्तुल / रिवॅाल्वर ) रिपटिंग राइफल याचं लायसन्स बनवायचं असेल तर त्याची फी १०० रूपये आहे.
भारतात फक्त तीन प्रकारच्या बंदूकीसाठी लायसन्स दिले जाते. शॅार्टगन,हॅडगन,आणि स्पोटिंग गन यांचा समावेश आहे. एक व्यक्ती जास्तीत जास्त तीन बंदुकीच लायसन्स घेऊ शकतो. पंरतु बंदूक ठेवण्यावर निर्बंध आहेत. सरकारच्या नियमानुसार काही असे बंदूक आहेत, की जे सामान्य माणसाला देता येत नाही.
लायसन्स मिळाल्यानंतरही तुम्हाला प्रक्रिया असलेल्या आधारावर लायसन्स खरेदी करावी लागतात. बंदूक विकत घेतल्यानंतर जवळच्या पोलिस स्टेशनला याची माहिती द्यावी लागते. तसेच तुम्ही घेतलेल्या बंदुकीची पोलिसांकडे देखील माहिती असते. वेळोवेळी याची माहिती पोलिस स्टेशनला द्यावी लागेल.