India v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान

India v Pakistan : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान चर्चेत आले आहे.  

Updated: Mar 21, 2023, 03:50 PM IST
India v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान title=
Asia Cup 2023 Shahid Afridi

India v Pakistan : आगामी आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट बोर्ड (Indian Cricket Board) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) यांच्यात वाद सुरू आहे. खरं तर नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. अशातच पाकिस्ताननेही आक्रमक पवित्रा घेत भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभागी न होण्याचे म्हटले आहे.  याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले  विधान चर्चेत आले आहे.  

भारत आणि पाकिस्तान (India v Pakistan) यांच्यात अनेक दिवसांपासून कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळलेली नाही. आता हे दोन संघ आयसीसी स्पर्धा किंवा आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धांमध्ये आमनेसामने येणार आहे. मात्र, राजकीय कारणांमुळे दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होणार नाही. दोन देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्याच वेळी, दोन्ही संघांमधील शेवटचा सामना 2022 टी-20 विश्वचषकादरम्यान खेळला गेला होता. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध पूर्ववत होण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 

वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी

शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?

दोहा येथे लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या निमित्ताने शाहीद आफ्रिदी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिक जबाबदारी दाखवली पाहिजे कारण ते खूप मजबूत बोर्ड आहे आणि दोन क्रिकेट राष्ट्रांमधील संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेटला परवानगी देण्याची विनंती करणार आहे. मी मोदी साहेबांना विनंती करेन की, दोन देशांदरम्यान क्रिकेट होऊ द्यावे. असे म्हणत शाहिद आफ्रिदी यांनी इच्छा व्यक्त केली आहे. 
 
तसेच आफ्रिदी पुढे म्हणाले की, जर आपल्याला एखाद्याशी मैत्री करायची असेल आणि तो आपल्याशी बोलत नसेल तर आपण काय करू शकतो? बीसीसीआय हे खूप मजबूत बोर्ड आहे यात शंका नाही, पण जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. तुम्ही शत्रू बनवण्याचा प्रयत्न करू नका, तर तुम्हाला मित्र बनवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही जास्त मित्र बनवता तेव्हा तुम्ही मजबूत होतात.

पीसीबी कमकुवत नाही....

पीसीबी हा 'कमकुवत बोर्ड' आहे का, असे विचारले असता आफ्रिदी म्हणाला की, मला तसे वाटत नाही. मी कमकुवत म्हणणार नाही, पण समोरून (बीसीसीआय) काही उत्तरेही आली. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने भारतीय खेळाडूंसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाकडून त्याला बॅट भेट म्हणून मिळाल्याचे आफ्रिदीने उघड केले.