Shubman Gill | फसला! शुभमन गिल कोणाला डेट करतोय? फोटो शेअर करत 'सार' काही सांगून टाकलं...

Shubman Gill : भारतीय क्रिकेटर शुभमन गिल गेल्या काही काळापासून त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे जोरदार चर्चेत आहे. पण याबाबत स्वत: शुभमन गिलने नक्की कोणाला डेट करतोय याचा पुरावा दिला आहे. याबाबत व्हॅलेंटाइन डे निमित्त त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. 

Updated: Feb 15, 2023, 09:16 AM IST
Shubman Gill | फसला! शुभमन गिल कोणाला डेट करतोय? फोटो शेअर करत 'सार' काही सांगून टाकलं...  title=
Shubman Gill and Sara Tendulkar visit the same London restaurant

Shubman Gill: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) त्याच्या दमदार खेळासोबतच त्याच्या अफेअरसंबंधित चर्चांमुळेही प्रसिद्धीझोतात असतो. शुभमन गिल कोणाला तरी डेट करत आहे, या चर्चा तर होत्याच पण ती सारा म्हणजे सारा तेंडुलकर (sara tendulkar) की सारा अली खान हे मात्र स्पष्ट नव्हत. याबाबत सोशल मीडियावर सारा तेंडूलकर असे गृहीत धरून सर्वच त्याला चिडवत असतं. मात्र काल (14 फेब्रुवार) व्हॅलेंटाइन डे निमित्त याबाबत खुद्द शुभमन गिलयाने कोणाला डेट करतोय याची नकळत माहिती दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

शुभमन गिलने शेअर केला फोटो 

शुभमनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो एका रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये बसलेला दिसून येत आहे.  त्याच्या हातात एक कप आहे आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘What day is it again??’

सारा तेंडुलकरनेही पोस्ट केला फोटो

तर काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरनेही (sara tendulkar) एक फोटो पोस्ट केला होता. साराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘हे सिरी, माझं जेवण कुठे आहे?’ विशेष म्हणजे सारा आणि शुभमनने पोस्ट केलेल्या या फोटोंमागील बॅकग्राऊंड अगदी सारखाच आहे. म्हणूनच नेटकरी या दोघांच्या डेटिंगविषयी चर्चा करत आहेत. या दोघांचा फोटो एकाच दिवशी काढलेला आहे, असा अंदाजही नेटकरी वर्तवत आहेत. 

वाचा: प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक! 

फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

शुभमन गिलने जसा फोटो शेअर केला तसं नेटकरी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. यावर एका युजर्सने लिहिलं, ‘सारा तेंडुलकरवाला बॅकग्राऊंड’. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘मागे डावीकडे जी मुलगी आहे, तीसुद्धा दोन्ही फोटोंमध्ये सारखीच दिसतेय.’ आणखी एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय, ‘लक्षपूर्वक पहा, यामध्ये शुभमनची हेअरस्टाइल वेगळी आहे, म्हणजेच हा फोटो जुना आहे.’ 

सारा अली खान सोबतचे फोटो व्हायरल 

23 वर्षीय शुभमन गिल सारा अली खानसोबत अनेकदा स्पॉट झाला आहे. यानंतर अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला. पण एका टॉक शोमध्ये साराच्या आणि त्याच्या लिंकअपच्या बातम्यांवर शुभमन असं काहीतरी बोलून गेला ज्यानंतर या अफवांनी खूप जोर धरला. टॉक शोमध्ये जेव्हा शुभमन गिलला विचारण्यात आलं की, तो सारा अली खानला डेट करतोय की नाही? प्रत्युत्तरात क्रिकेटर म्हणाला- कदाचित... शुभमनच्या वक्तव्यादरम्यान, सारा अली खानसोबतचे क्रिकेटरचे फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये कधी हे दोन स्टार्स दुबई 2022 मध्ये एकत्र डिनर करताना दिसले तर कधी जयपूर एअरपोर्टवर दोघे एकत्र दिसले.