नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमने श्रीलंकेविरुद्ध असलेल्या तीन मॅचच्या टेस्ट सिरीज मध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने रविवारी सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेला ५३ धावांनी हरवले.
गॉलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी विजय मिळवला होता. श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा पहिला विजय होता. तर दुसरीकडे श्रीलंकेला २००० नंतर पहिले अपयश मिळाले होते. २००० मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला गॉलमध्येच १६३ धावांनी हरवले होते. विराट कोहली हा असा पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्याने श्रीलंकेविरुद्ध दोन सिरीज जिंकल्या आहेत.
कोहली कर्णधार असताना भारताने सातत्याने आठवी सिरीज जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयानंतर कोहली आणि त्याची टीम हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांच्या मस्तीचा व्हिडीओ शेयर करण्यात आला. व्हिडिओमध्ये कर्णधार कोहली, हरमन मौला, रवींद्र जडेजा, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू दिसत आहेत. दोन्ही देशांमध्ये तिसरा कसोटी सामना १२-१६ ऑगस्टला होणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट टीमने ५३ धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात ९ विकेटमध्ये ६२२ धावा केल्या. तर श्रीलंकेची टीम १८३ धावात बाद झाली. दिनेश चांदीमलच्या टीमला फॉलो ऑन देखील नाही करू शकले आणि दुसऱ्या डावात ३८ धावात आऊट झाले. रवींद्र जडेजाची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली. जडेजाने पहिल्या डावात ७० धावा केल्या आणि २ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. परंतु, भारतीय टीमसाठी एक वाईट बातमी म्हणजे दुसऱ्या सामन्यात गैर वर्तवणूक केल्याबद्दल एका सामन्यासाठी जडेजाला निलंबित करण्यात आले आहे आणि ५० टक्के मॅच फ़िक्सिन्गचा आरोप करण्यात आला आहे.
१० ऑगस्टला होणाऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवल्यास भारत सलग ९ सिरीज जिंकून आस्ट्रेलिया टीमने केलेल्या रेकॉर्डच्या बरोबरीत येईल. भारताने २०१५ मध्ये सलग ८ सिरीज जिंकल्या होत्या. आणि इंग्लंडची बरोबरी केली. इंग्लंडने १८८४-१९९२ मध्ये सलग आठ सिरीज जिंकल्या होत्या.