Dhoni Eating His Bat : धोनीला काय झालंय, बॅट चावतानाचा फोटो व्हायरल

धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत धोनी बॅट चावताना दिसत आहे. 

Updated: May 9, 2022, 01:32 PM IST
Dhoni Eating His Bat : धोनीला काय झालंय, बॅट चावतानाचा फोटो व्हायरल  title=

मुंबई : आयपीएलमधल्या रविवारच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ९१ धावांनी धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत धोनी बॅट चावताना दिसत आहे. धोनी नेमके असं का करतो असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आता त्याचाच जूना सहकारी असलेला दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा याने दिले आहे. अमित मिश्राच्या मते त्याला बॅट चावायला आवडते  म्हणून तो असे करत असल्याची माहिती दिली. 

यंदाच्या हंगामात धोनी तितकासा फॉर्ममध्ये नाही आहे.मात्र एखाद दोन सामन्यात त्याने विस्फोटक फलंदाजी करत आपणचं बेस्ट फिनीशर असल्याचे दाखवून दिले आहे.

त्यातच चेन्नईची कर्णधारपद आता पुन्हा एकदा त्याच्या हाती आल्याने सर्व सीएसके चाहत्यांना ट्रॉफी उंचावण्याची उत्सूकता लागली आहे.   

दिल्ली विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने आठ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि एक चौकार लगावत २१ धावा केल्या होत्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये मैदानात उतरत त्यांनी ही कामगिरी केली.

मात्र मैदानात उतरण्यापूर्वी धोनी बॅट चावताना कॅमेरात कैद झाला होता. त्याचा हा फोटो रविवार पासून सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. 
 
अमित मिश्रा काय म्हणाला ?

महेंद्र सिंह धोनीचा व्हायरल फोटो ट्विट करत अमित मिश्रा म्हणाला, तूम्ही जर विचार करत असाल धोनी बॅट का खातो ? तर धोनी आपली बॅटवरील टेप काढण्यासाठी असे करत असतो. कारण धोनीला बॅट साफ ठेवायला आवडते.  तूम्ही धोनीच्या बॅटमधून एकही टेप अथवा धागा निघताना दिसला नाही.  

आयपीएलच्या या हंगामात धोनीने 11 सामन्यात 32.60 च्या सरासरीने 163 धावा केल्या आहेत. या सीजनमध्ये धोनीने आतापर्यंत एक अर्धशतक झळकावले आहे.   

नवीन रेकॉर्ड 

टी 20 सामन्यात  6000 रन्स पूर्ण करणारा धोनी हा दुसरा खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा दुसरा कर्णधार ठरला आहे.

तर धोनीच्या आधी विराटचा नंबर लागतो. विराट कोहली 6 हजार  451 रन्स करत पहिल्या क्रमांकावर आहे. तर महेंद्रसिंह धोनीने 6013 रन्स केले आहेत.