पंतप्रधान मोदींनी विरुष्काला दिले 'हे' खास गिफ्ट....

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारताबाहेर टस्कनीमध्ये विवाहबद्ध झाले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 22, 2017, 11:51 AM IST
पंतप्रधान मोदींनी विरुष्काला दिले 'हे' खास गिफ्ट.... title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारताबाहेर टस्कनीमध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर हनिमून आणि मग दिल्ली, मुंबईत रिसेप्शन असा उर्वरीत कार्यक्रम होता. 

पंतप्रधान मोदींना आमंत्रण

दिल्लीच्या रिसेप्शनसाठी या नवदाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले. आणि मोदींनी आर्वजून विरूष्काच्या रिसेप्शनाला उपस्थिती लावली. मात्र जाताना ते रिकाम्या हाताने गेले नाहीत तर त्यांनी विरूष्काला आशीर्वादासोबतच खास भेटवस्तूही दिली.

व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल

विरुष्काच्या रिसेप्शन सोहळ्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडिओ मोदींचा देखील आहे. त्यात ते विरूष्काला शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर येताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या खास भेटवस्तूने भारावून गेलेले विरूष्काचा आनंद कमेऱ्यातून सुटला नाही.

काय दिले गिफ्ट?

मोदींजी स्टेजवर येताच विरूष्काने हात जोडून त्यांचे स्वागत केले. मोदींनी शुभेच्छा आणि गुलाबाचे फुल भेट म्हणून दिले. अतिशय साधी पण सुंदर भेट मिळाल्याने विरूष्का अत्यंत खूश झाले.

मग कामाला सुरूवात...

२६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील. मुंबईमधलं रिसेप्शन झाल्यावर विराट कोहली भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होईल. तर जानेवारी महिन्यामध्ये अनुष्का शर्मा नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.