'...आणि मला खूप मार खावा लागला', विराट कोहलीचा कधीही न ऐकलेला किस्सा

Virat Kohli Untold Story: समोर कोणीही बॉलर्स असला तरी कोहली त्याला मोठमोठे फटके लगावतोच. याच कोहलीला लहानपणी फटके बसले आहेत. 

Updated: Dec 26, 2023, 03:08 PM IST
'...आणि मला खूप मार खावा लागला', विराट कोहलीचा कधीही न ऐकलेला किस्सा title=

Virat Kohli Untold Story: भारतीय टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीची फॅन फॉलोइंग केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही आहे. विराट कोहली मैदानासोबतच बाहेरदेखील तितकाच चर्चेत असतो. आता न्यूज, सोशल मीडियाच्या जमान्यात विराट कोहलीबद्दलच्या अनेक गोष्टी सर्वांना माहिती आहेत. विराटच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. त्यात असेही काही किस्से आहेत, जे त्याने कधीच कोणाला सांगितले नाहीत. पण अनेक वर्षांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. ज्यामध्ये विराट कोहलीला मार खावा लागला होता.  

विराट कोहलीला मैदानावर फटकेबाजी करताना आपण पाहिले असेल. समोर कोणीही बॉलर्स असो तो मोठमोठे फटके लगावतोच. याच कोहलीला लहानपणी फटके बसले आहेत. हे फटके क्रिकेटचे नव्हते. तर बहिणीकडून मिळाले होते. काय आहे तो प्रसंग? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

वडिलांच्या जाण्यानंतर कोहलीला त्याच्या बहिणीने संभाळले आणि सर्व कामात नेहमी पाठीशी राहिली. या दोघांमध्ये खूप चांगले बॉंडींग आहे. विराट कोहली आणि त्याची बहिण भावनाचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असतात. किंग कोहलीने त्याच्या बहिणीशी संबंधित लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होतोय.  त्याची बहिण भावनाने एका छोट्या गोष्टीवरुन विराटची खूप धुलाई केली होती. 

विराट कोहलीने आपल्या सवयींमुळे लहानपणी बहिणीकडून खूप मार खाल्ला आहे. भारतीय टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितले की, लहानपणी माझ्या मोठ्या बहिणीला तू म्हणून संबोधित करायचो. त्यामुळे ती खूप चिडायची आणि मी खूप मार खाल्ला होता. तिने मला खूप मारले, खूप मारले. मी तू म्हणूनच तिच्याशी बोलयचो. एका दिवशी माहिती नाही काय झालं पण तिला खूपच राग आला. तेव्हा मला दीदीने असे मारले की माझ्या तोंडून तू निघायचे बंद झाले. त्यानंतर माझ्या तोंडून फक्त तुम्ही असेच निघायचे. तुम्ही कसे आहात, तुम्ही काय करत आहात? हेच माझ्या तोंडून निघायचे. 

यासोबतच विराट कोहलीने आणखी एक न ऐकलेला किस्सा सुनावला. मी लग्नाला जायचो तेव्हा तिथे वरातीमध्ये लोकांना पैसे उडवताना मी पाहायचो. मला हे पाहून खूप भारी वाटायचं. दरम्यान, एकदा घरी कोणी तरी आले होते आणि मला सामान आणण्यासाठी 50 रुपये देण्यात आले होते. माझ्या डोक्यात काय किडा वळवळला माहिती नाही. मी 50 रुपयांचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते उडवून नाचू लागलो. घरी सामान घेऊन गेलो नव्हता. 

किंग कोहलीचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. पण सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे.