उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी खास ४ ठिकाणं!

पर्यटनप्रेमी फिरायला जाण्यासाठी नेहमीच सुट्ट्यांची वाट पाहत असतात.

Updated: Mar 17, 2018, 03:57 PM IST
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी खास ४ ठिकाणं! title=

मुंबई : पर्यटनप्रेमी फिरायला जाण्यासाठी नेहमीच सुट्ट्यांची वाट पाहत असतात. सध्या उन्हाळा सुरु झालाय. लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होतील. अशावेळी फिरायला नेमकं कोठे जायंच, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे घ्या काही खास पर्याय.

हंप्पी-

हंप्पी भारतातील कर्नाटक राज्यात वसलेले हंप्पी हे नगर. भारताच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी अनेक पर्यटक येथे येतात. येथे पाचशे पेक्षा अधिक स्मारक आहेत. यात मंदिर, महल, जुने बाजार, गड, चबुतरे, शाही मंडप इत्यादी असंख्य इमारती आहेत. हंप्पीतील विठाला मंदिर परिसर हे सर्वात शानदार स्मारक आहे. तुम्ही ४ दिवसात येथे पुष्कळ काही पाहु शकता. 

काश्मिर- 

काश्मिरला जाण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीयाचे असेल. तेथील थंडी हवा, बर्फांचे पर्वत आणि शिकारा बोटींग पर्यटकांना अधिक आकर्षित करतात. पार्टनरसोबत जाण्यासाठी ही जागा अत्यंत सुयोग्य आहे. 

लक्षद्वीप-

उन्हाळ्याच्या सुट्टीत आईसलॅंडला जाणे परफेक्ट होईल. येथे सुर्याच्या कोवळ्या उन्हात बीचवर फिरणे, बोटींग करणे, समुद्रात खेळणे आणि पाण्याच्या मधोमध कॅँडल लाईट डिनर या सगळ्याची मज्जा तर काही औरच आहे. कठमठ, मिनीकॉय. कवरत्ती, बंगाराम, कल्पेनी आणि अगाती या द्वीपांवर तुम्ही एन्जॉय करु शकता.

लडाख-

तुम्हाला जर खूप थंडीच्या ठिकाणी जाणे आवडत असेल तर ही जागा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. येथील स्वच्छ, नितळ नदीचे पाणी, बर्फ आणि हलकंस ऊन यामुळे सुरेख माहोल बनतो.