बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी

सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 20, 2017, 02:43 PM IST
बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी  title=

नवी दिल्ली : सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँकेत ४२८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट ऑफिसर्स या पदांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधीच आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर आहे. इच्छुकांना अधिक माहिती बँकेच्या recruitment@bankofbaroda.co.in वेबसाईटवर पहायला मिळेल.

एकूण पदे: ४२८

पदाचे नाव:

स्पेशालिस्ट ऑफिसर्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

५ डिसेंबर २०१७

शैक्षणिक योग्यता:

मार्केटिंग / सेल्स / रिटेलमध्ये स्पेशलायजेशनसोबत २ वर्षांचा फुल टाईम एमबीए कोर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री / डिप्लोमा 

शुल्क:

एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये आणि इतर मागासवर्गीय, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये शुल्क भरावं लागणार आहे

नोकरीचं ठिकाण:

भारतात कुठेही

असा करा अर्ज:

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार recruitment@bankofbaroda.co.in या साईटवरुन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करताना उमेदवारांना ऑनलाईन पद्दतीने शुल्क भरावं लागणार आहे.

वयोमर्यादा:

विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया:

उमेदवाराची निवड ग्रुप डिस्कशन, मुलाखत आणि एका टेस्टच्या आधारावर करण्यात येणार आहे.