शिक्षण विभागाचा अजब कारभार, दुर्गम भागातील ISO शाळा देखील बंद

राज्याच्या शिक्षण विभागाने काढलेल्या शाळा बंदचा फटका अतिदुर्गम भागाला बसतो आहे. या निर्णयाने वस्ती-पाड्यातील चक्क ISO शाळा देखील बंद झाल्या आहेत.

Updated: Dec 29, 2017, 01:00 PM IST
शिक्षण विभागाचा अजब कारभार, दुर्गम भागातील ISO शाळा देखील बंद title=

मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाने काढलेल्या शाळा बंदचा फटका अतिदुर्गम भागाला बसतो आहे. या निर्णयाने वस्ती-पाड्यातील चक्क ISO शाळा देखील बंद झाल्या आहेत.

पालक-विद्यार्थ्यांची निदर्शने 

चंद्रपूर जिल्ह्यातील गेडामगुड्याचे विद्यार्थी या निर्णयाने हिरमुसले आहेत. शाळा बंद झाल्याने पालक-विद्यार्थ्यांनी शाळेपुढे निदर्शने केली. पटसंख्या निकषाचा नियम चिमुकल्यांच्या मुळावर उठला आहे. 

राज्य शासनाचे विसंगी धोरण

एकीकडे एकही मुल शाळाबाह्य असणार नाही, असे धोरण आणि दुसरीकडे शेकडो शाळा बंद करण्याचे जीआर यामुळे धोरण विसंगती नजरेस पडत आहे. या हिरमुसल्या चिमुकल्यानी आपले गा-हाणें कुणाला सांगावे असा पेच निर्माण झाला आहे.