close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांवर भरती, पाहा कुठल्या पदांसाठी होतेय भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दोन वर्षांनंतर ई-कॉमर्स कंपवनी फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० जागांसाठी होणार आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 23, 2018, 05:37 PM IST
फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांवर भरती, पाहा कुठल्या पदांसाठी होतेय भरती

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दोन वर्षांनंतर ई-कॉमर्स कंपवनी फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० जागांसाठी होणार आहे.

फ्लिपकार्टने हैदराबाद आणि बंगळुरु येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या २० विद्यार्थ्यांना ऑफर लेटरही पाठवलं आहे. या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान करण्यात आली होती.

'या' विभागात निघाली भरती

फ्लिपकार्ट कंपनीने ज्या विभागात भरती प्रक्रिया सुरु केली आहे त्यापैकी बुतांश हे टेक्नोलॉजी विभागातील आहेत. कंपनीने या विभागात डेटा सायंटिस्ट (शास्त्रज्ञ), UI आणि UX डिझायनर्स, प्रोडक्ट इंजिनिअर्स, टेक प्रोग्राम मॅनेजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व्हिस डिलिव्हरी आणि आयटी अॅप्लिकेशन यांचा समावेश आहे.

कंपनीने यापूर्वी आयआयटी आणि आयआयएमच्या ऐवजी इतर संस्थांमधून कॅम्पस प्लेसमेंट केलं होतं. कंपनीने ५० डेटा सायंटिस्टही भरती केले आहेत.

सर्वच विभागांत होणार भरती

कंपनीचे सीओओ नितीन सेठ यांनी सांगितले की, २०१८ मध्ये कंपनीचा प्लान आहे की अधिकाधिक युवकांना नोकरीवर ठेवावं. यासाठी कंपनीने आपल्या विविध विभागांत भरती सुरु केली आहे. यापूर्वी कंपनीने १५०० जागांवर भरती करण्यात आली आहे.